बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेला अन्…

मुले पळविणारा समजून जमावाने बदडले
नाशिक : प्रतिनिधी
सद्या नाशिक शहरामध्ये मुले पळविण्याची मोठी अफवा पसरली आहे. दोन दिवसांपूर्वी मुले पळविणारे समजून दोन जणांना मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच काल वडाळा भागात बुरखा घालून प्रेयसीला भेटण्यास आलेल्या प्रेमवीराला जमावाने धु धु धुतल्याने प्रेयसीला भेटावयास येणे या प्रियकराला चांगलेच महागात पडले आहे.
त्याचे झाले असे वडाळा गावात राहणार्‍या प्रेयसीला भेटण्यासाठी तिचा प्रियकर आला. त्याने बुरखा घातलेला होता. मात्र, त्याच्या चालण्याच्या लकबीवरुन ही महिला नाही तर पुरुष असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. सद्या नाशिकमध्ये मुले पळविणार्‍यांची टोळी फिरत असल्याच्या अफवांचा बाजार उठला आहे. त्यामुळे बुरखा घालून हा युवक मुले पळविण्यास आला असा गैरसमज झाला आणि नागरिकांचा जमाव जमू लागताच या युवकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावातील काही युवकांनी या बुरखाधारी प्रेमविराला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. काहींनी पोलिसांना पाचारण केले. पोलिस आल्यानंतरही युवक या प्रेमविराला बदडतच होते. प्रेमविराला धुत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे प्रेयसीला भेटण्यास जाणे या युवकाला चांगलेच महागात पडले. नाशिकमध्ये मुले पळविणार्‍यांची टोळी फिरत असल्याची अफवा सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात पसरली जात आहे. त्यातून असे प्रकार वाढीला लागले आहे. दोनच दिवसांपूर्वी गंजमाळ परिसरातही अशाच समजुतीतून दोघांना मारहाण झाली होती.

Bhagwat Udavant

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

2 days ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

4 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

4 days ago