खासगी बसच्या  अपघातात 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

नाशिक :

नाशिक शहरातील हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात  खासगी प्रवाशी बस जळून खाक झाली. ही आग एवढी मोठी  होती की त्यात ११ पेक्षा अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला. त्यात बसचालकाचाही मृत्यू झाला.

यवतमाळ येथून ही बस काल रात्री नाशिकमार्गे मुंबईच्या दिशेने जात होती.  त्यातून ३8 पेक्षा अधिक प्रवाशी प्रवाशी होते.  औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात आयशर ट्रक आणि बस यांच्यात भीषण अपघात झाला. यात ट्रकची डिझेल टाकून फुटून सर्वत्र डिझेल पसरले आणि दुसरीकडे बस अन्य एका चारचाकीला धडकली. त्यानंतर लगेचच बसमध्ये स्फोट होऊन आग लागली. अनेक प्रवाशी झोपेत असल्याने काही समजण्याच्या आतच भाजून त्यांचा मृत्यू झाला.

बसमधील जे प्रवाशी जागे होते त्यांनी तातडीने बसबाहेर धाव घेत मदतीसाठी आकांत सुरू केला. घटनास्थळापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर अग्निशमन दलाचे केंद्र असतानाही प्रत्यक्षात मदत पोहोचण्यासाठी तब्बल एक तास लागला. आधी पोलीस, त्यानंतर अग्नीशमन आणि नंतर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत स्थानिक नागरिक आणि या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी मदतकार्य सुरू केले होते. मात्र, आग एवढी भीषण होती त्यामुळे प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून पाच लाखाची मदत देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्याचप्रमाणे जखमीवरील उपचाराचा खर्च ही सरकारकडून करण्यात येणार आहे.

Ashvini Pande

Recent Posts

लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही

लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…

16 minutes ago

अखेरच्या सोमवारी शिवभक्तांची गर्दी

नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…

29 minutes ago

विंचूर-गोंदेगाव रस्ताकामाला अखेर मुहूर्त!

रहिवाशांमध्ये समाधान; नववसाहतींच्या विकासाला मिळाली नवी दिशा विंचूर : प्रतिनिधी विंचूरच्या मध्यवर्ती तीन पाटीपासून हाकेच्या…

40 minutes ago

मेळघाटातील महिलांना उद्योजकतेचे धडे; पारंपरिक कलाकुसरीला नवे कोंद

नाशिक ः देवयानी सोनार आदिवासी समाजातील पेहराव, दागिने, दागिन्यांचे नक्षीकाम लोप पावत चालले आहे. नवीन…

52 minutes ago

मनपाची प्रभागरचना शुक्रवारी प्रसिद्ध होणार

हरकतींवरील सूचनांसाठीच्या कालावधीत मुदतवाढ नाशिक : प्रतिनिधी गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिक महापालिका प्रशासनाकडून प्रभागरचना तयार…

58 minutes ago

सिन्नर गोंदेश्वराला फुलांची सजावट

सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…

2 hours ago