१ जुलै पासून चारचाकी वाहन घेणे महागणार : वाहन घेणाऱ्यांच्या खिशाला भुर्दंड
पंचवटी : सुनील बुनगे
चारचाकी वाहनांच्या करात प्रादेशिक परिवहन विभागाने १ टक्क्याने वाढ करण्यात आली असून १ जुलै २०२५ पासून आता चारचाकी वाहने महाग होणार आहे. तर पूर्वी मालवाहू वाहने जसे की, पिक अप,टेम्पो आदी यांना ज्यांचे ओझे लादलेले असताना नोंदणीकृत वजन साडे सात टन ( ७५०० ) यांना एकरकमी कर आकारला जायचा आता त्या वाहनांच्या खरेदीवर मोटर वाहनाच्या किमतीवर ७ टक्के एकरकमी कर भरावा लागणार आहे.त्यामुळे खाजगी वाहन घेणारे वाहन मालक आणि शेतकरी व मालवाहू वाहन घराण्याच्या घेणाऱ्यांच्या खिशाला मात्र आता भुर्दंड सोसावा लागणार आहे.
राज्याच्या परिवहन आयुक्तांनी तसे परिपत्रक काढले आहे.यात महाराष्ट्र मोटर वाहन कर ( सुधारणा ) अधिनियम २०२५ मधील तरतुदी लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यामुळे १ जुलै २०२५ पासून चाारचाकी वाहनांना नवीन मोटर वाहन कर लागू होणार आहेत. यापूर्वी ज्या वाहनांना १० लाखांपर्यंत ७ टक्के कर होता तो ८ टक्के झाला असून २० लाखांपर्यंत ८ टक्के आता तो ९ टक्के तर २० लाखांच्या पुढील वाहनांना ९ टक्के होता तो १० टक्के इतका भरावा लागणार आहे.तर ज्या वाहनाच्या UW ( रिकाम्या गाडीचे वजन ) किंवा GVW ( मालसहित वजन ) नुसार वार्षिक कर होता तो आता मोटर वाहनाच्या किमतीच्या ७ टक्के एकरकमी भरावा लागणार आहे.तसेच ओझे लादलेले असताना ज्या वाहनाचे वजन साडे सात टन ( ७ हजार ५००) किलो पेक्षा जास्त नसेल अशी माल वाहतुकीकरता वापरले जाणारे हलके मालवाहू वाहनांना वाहनात भरलेल्या मालासहित एकरकमी कर होता तो आता मोटर वाहनाच्या किमतीच्या ७ टक्के करण्यात आला आहे.
१ जुलै २०२५ पासून लागू होणारे नवीन मोटर वाहन कर
दुचाकी किंवा चारचाकी ( खाजगी ) सीएनजी किंवा एलपीजी वाहने
( जुने कर दर )
१० लाखापर्यंत ७ टक्के
२० लाखापर्यंत ८ टक्के
२० लाखाच्या पुढे ९ टक्के
( नवीन कर दर )
१० लाखापर्यंत ८ टक्के
२० लाखापर्यंत ९ टक्के
२० लाखाच्या पुढे १० टक्के
———————–
क्रेन , कॉम्प्रेसर्स प्रोजेक्टर किंवा खनित्रे यासारखी बांधकामा करता वापरली जाणारे कोणतेही मोटर वाहने
( जुने कर दर)
वाहनाच्या रिकाम्या गाडीचे किंवा ( GVW) मालसहित नुसार वार्षिक कर
( नवीन कर दर)
मोटर वाहनाच्या किमतीच्या ७ टक्के एकरकमी कर
—————————
ओझे लादलेले असताना ज्याचे नोंदणीकृत वजन ७५०० किलो पेक्षा अधिक नसेल अशी माल किंवा सामग्री यांच्या वाहतुकीकरिता वापरले जाणारे हलकी मालवाहू वाहने
( जुने कर दर )
वाहनाच्या ( GVW ) मालसाहीत वजनानुसार एकरकमी कर
(नवीन कर दर)
मोटर वाहनाच्या किमतीच्या ७ टक्के एकरकमी कर
————————–
वाहनाची जास्तीत जास्त कर मर्यादा
( जुने कर दर )
२० लाख
( नवीन कर दर )
३० लाख
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…