नाशिकमध्ये या कारणामुळे घर घेणे आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर

नाशिकमध्ये घर घेणे आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर

रेडीरेकनर दरात ७.३१ टक्के  वाढ

नाशिक : प्रतिनिधी

राज्य सरकारने काल (दि.३१) नवीन आर्थिक वर्षाच्या पूर्वसंध्येला रेडी रेकनर दर जाहिर केले.कोरोना संकटानंतर मागील दोन वर्षांपासून रेडीरेकनरच्या दरात शासनाने वाढ केली नव्हती. त्यामुळे यंदा आर्थिक वर्षासाठी शासन रेडीरेकनर  दरात वाढ करेल ही शक्यता खरी ठरली आहे. नाशिक शहरात ७.३१ टक्के इतकी दर वाढ केल्याने नाशिकमध्ये घरांच्या किंमती वाढणार असल्याने सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे.

राज्य सरकारने तब्बल दोन वर्षानंतर २०२५ – २६ या आर्थिक वर्षासाठी रेडिरेकनर दरात मोठी वाढ केली असून नाशिक शहरासाठी ही वाढ ७.३१ टक्के इतकी आहे. १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू राहणार आहे. दरम्यान आधीच घराच्या किंमती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर असताना दरवाढीमुळे घर खरेदीचे स्वप्नाला ब्रेक लागू शकतो. दरम्यान राज्यात सर्वाधिक दरवाढ (मुंबई वगळून) ही सोलापूर शहराची असून ती १०.१७ टक्के इतकी आहे.

ऐकावे ते नवलच: बंगला बळकावण्यासाठी बिल्डरनेच दिली दरोड्याची सुपारी
रेडीरेकनर दरात वाढ केल्याने त्याचा थेट परिणाम बांधकाम व्यवसायावर होणार आहे. त्याचा थेट परिणाम सदनिकांच्या किमतीत वाढ होईल. त्यामुळे शहरातील सदनिकांच्या किमंतीत मोठी वाढ होणार आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न आणखी महाग होणार असून ग्राहकांच्या खिशाला झळ सोसावी लागेल. जीएसटी, विक्री कर, यानंतर तिसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक उत्पन्न नोंदणी आणि मुद्रांक शुल्कातून मिळते.राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील गेल्या दोन वर्षांत झालेल्या खरेदी-विक्रीची रक्कम विचारात घेत वेगवेगळ्या भागांत वाढीचे वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहे.
दरम्यान रेडी रेकनरच्या दरात वाढ होणार असल्याने याचा परिणाम थेट खरेदी-विक्री व्यवहारावर होणार असून यात तब्बल साडे सात टक्के वाढ झाल्याने रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्यांना अधिकचा कर, स्टॅम्प डयुटी, रजिस्ट्रेशन शुल्क या सह एजंटची फी या सर्व प्रक्रियेतून जावे लागणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना याचा फटका तर बसणार आहे.

नामांकित बिल्डरच्या घरावर गोळीबार

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

19 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

20 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

20 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

20 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

20 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

20 hours ago