येवला : प्रतिनिधी
तालुक्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प येवला-1 व येवला-2 या कार्यालयांतर्गत रिक्त असणारी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदाची भरती प्रक्रिया होणार आहे. पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करावेत, असे आवाहन येवला पंचायत समिती बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती वंदना शिंपी यांनी केले आहे.
अंगणवाडीसेविका, मदतनीस या पदासाठी किमान शैक्षणिक अर्हता बारावी उत्तीर्ण उमेदवार असावा, तसेच वय 18 ते 35 वर्षादरम्यान असून विधवांंसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे राहणार आहे. उमेदवार हा त्या महसुली गावाचा रहिवासी असावा. रहिवासी दाखला तहसीलदारांच्या सहीचा आवश्यक आहे. इच्छुक व पात्र गरजू महिला उमेदवारांनी 3 ते 16 जूनदरम्यान कार्यालयीन दिवशी आपले अर्ज सादर करावेत. येवला प्रकल्प-1 साठी अंगणवाडीसेविकांच्या देवळाणे, खामगाव, सत्यगाव, काळेवस्ती (सताळी) या चार जागा असून, मदतनीसाच्या निमगाव मढ, नांदेसर व कोटमगाव बुद्रुक या तीन जागा आहेत.
येवला प्रकल्प-2 साठी मदतनिसांच्या ठाणगाव व खैरगव्हाण येथे जागा आहेत. या रिक्त अंगणवाडीसेविका व मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय तसेच पंचायत समितीच्या प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती शिंपी यांनी केले.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…