नाशिक

खेडले येथे बिबट्याकडून वासराचा गोठ्यात फडशा

वन विभाग अ‍ॅक्शन घेणार कधी?

दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील खेडले येथील विनोद शांताराम पगार यांच्या वस्तीवर रात्री बाराच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात शिरून वासरावर हल्ला केला. त्याच ठिकाणी बिबट्याने वासराचा फडशा पाडला. वनविभागाने सकाळी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
दिंडोरी तालुक्यात सध्या नरभक्षक बिबट्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे जनतेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एका महिन्यात वनारवाडी येथे तरुणीवर हल्ला करून ठार केले, तर दिंडोरीत जाधव वस्तीवर चार वर्षाच्या चिमुकल्याचा बिबट्याने बळी घेतला. वन विभागाने तालुक्यातील ज्या गावांमध्ये बिबट्याचे प्रमाण अधिक आहे, अशा गावांमध्ये जाऊन जनजागृती करणे आवश्यक असताना तसे होताना दिसत नाही. हल्ला झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी यांना फोनवर जणू आमंत्रण द्यावे लागते, अशी परिस्थिती आहे. ज्या गावांमध्ये बिबट्यांचे प्रमाण अधिक आहे,
अशा गावांसाठी पिंजर्‍यांची संख्या वाढवून त्या गावांमध्ये पिंजरे लावावे किंवा त्या गावांसाठी पिंजरे राखीव ठेवावे. मात्र सध्या वनविभाग गाफील असल्याचे चित्र आहे. असे किती बळी बिबट्याने घेतल्यानंतर वनविभाग अ‍ॅक्शन मोडवर येणार, अशी चर्चा तालुक्यात होत आहे.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

13 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

13 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

13 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

13 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

13 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

14 hours ago