महाराष्ट्र

नागपुरात रात्री कारला आग

नागपूर : वर्धा मार्गाने घरी जात असताना अचानक कारमधून धूर निघायला लागला. चालकाने कार थांबवली आणि कारमधून बाहेर पडताच कारचा भडका उडाला. ही घटना शनिवारी रात्री छत्रपती उड्डाणपुलावर घडली. प्रतापनगर पोलिस व अग्निशमन यंत्रणाही पोहोचली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. हर्षल महाजन (वय 35, रा. बुटीबोरी) असे कारचालकाचे नाव आहे. हर्षल मूळचे अकोल्याचे असून, नागपुरात नोकरी करतात. शनिवारी रात्री कार्यालयातील काम आटोपून ते एमएच-30-एए-4485 या क्रमांकाच्या कारने घराकडे निघाले होते. छत्रपती उड्डाणपुलापर्यंत गेले असता, कारच्या मागच्या भागातून धूर निघायला लागला. मागच्या वाहनचालकाने लगेच ही माहिती दिली. हर्षलने लगेच कार थाबवली आणि बाहेर पडले. क्षणभरात कारने भडका घेतला. रस्त्याने जाणार्‍या वाहनचालकाने सांगितले नसते तर अनर्थ घडला असता.

Gavkari Admin

Recent Posts

नाशिकरोडमध्ये ठाकरे गटाला खिंडार, बबन घोलप हाती घेणार कमळ

नाशिक: प्रतिनिधी शिर्डी लोकसभा मतदार संघात उमेदवारी न दिल्यामुळे नाराज होत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर…

8 hours ago

ओझरच्या बोरस्ते विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात शाळा प्रवेशोत्सव.

 ओझर : वार्ताहर  येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माधवराव बोरस्ते विद्यालयात पहिल्या दिवशी प्रवेशोत्सवा…

11 hours ago

एमडी ड्रग्ज विक्री करणारे दोघे जेरबंद

साडेआठ ग्रॅम एमडीसह 2 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त…

11 hours ago

गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणारा व्यक्ती अटकेत

12 लाख 45 हजारांचा मुद्देमाल हस्तगत सिडका : विशेष प्रतिनिधी प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू…

11 hours ago

गोदावरीत मिसळणारे दूषित पाणी थांबवण्याची मागणी

शिलापूर ः प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून गोदावरी नदीपात्रात दूषित पाणी मिसळत असल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याने जलचर…

11 hours ago

जगावर तिसर्‍या महायुद्धाचे ‘सावट’!

गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. अमेरिकेबरोबरच इतर देशांनी मध्यस्थीचे प्रयत्न करून पाहिले. मात्र,…

11 hours ago