पंचवटी : प्रतिनिधी
गोदाघाट परिसरातील साईबाबा मंदिरासमोरील भुयारी गटारीसाठी खोदलेल्या खड्ड्यात शनिवारी (दि. 21) नाशिक पर्यटनासाठी आलेल्या भाविकाची गाडी सुमारे 12 ते 15 फूट खड्ड्यात कोसळली. या घटनेत सुदैवाने कुठल्याही प्रकारची दुर्घटना झाली नसून, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त
केला आहे.
नाशिक शहरातील विविध भागांत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामे सुरू आहेत. त्यातच गोदाघाट परिसरातील सुलभ शौचालय ते देवी मंदिरदरम्यान भुयारी गटारीचे काम सुरू असून, या भागात मोठ्या प्रमाणात रस्ता खोदून ठेवला आहे. रस्ता खोदला असला तरी या ठिकाणी ठेकेदाराने या भागात कुठल्याही प्रकारे तशा प्रकाराचा सूचनाफलक अथवा सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेतली नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी (दि.21) मुंबई भागातील पर्यटक पंचवटी परिसरात दर्शनासाठी आले असता ते सरदार चौक परिसरातील साईबाबा मंदिरासमोरून रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास जात असताना त्यांना रस्त्यातील खड्ड्याचा अंदाज न आल्याने सुमारे 12 ते 15 फूट खोल खड्ड्यात त्यांची गाडी मारुती एक्स क्रॉस ( एमएच 46 डीए 0401) कोसळली. यावेळी गाडीत पती, पत्नीसह त्यांची दोन मुलं असल्याचे समजते. गाडी खड्ड्यात कोसळल्याने नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. तर याच ठिकाणी असलेल्या जेसीबीच्या सहाय्याने सदरची गाडी बाहेर काढण्यात आली. खड्ड्यात पाणी असल्याने गाडीतील कुठल्याही व्यक्तीला इजा झाली नसल्याचे समजते.
ठेकेदाराचा निष्काळजीपणा नडला
रस्ता फोडल्यानंतर त्या भागात बॅरिकेट आणि सूचनाफलक लावणे गरजेचे असताना, या ठिकाणी कुठल्याही प्रकारे दक्षता घेतली नव्हती. तर गोदाघाट परिसरात रोज अनेक भाविक येत असतात. त्यामुळे या भागात काळजी घेणे गरजेचे असताना कुठल्याही प्रकारे काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे सदरची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही.
Car falls into a ditch in front of Sai Baba temple
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…