नाशिक

लोकशाहीसह सर्वच व्यवस्था धोक्यात : निळू दामले

‘विवेकधारा’तर्फे नास्तिक मेळावा
नाशिक : प्रतिनिधी
काही वर्षांपासून जगातील धर्मवादाची जागा राष्ट्रवाद व राजकारणाने घेतली असून, देश वाचवणारा नेता म्हणजेच देव अशी धारणा निर्माण झाली आहे. अशा व्यवस्थेत प्रश्न विचारण्यास मुभा नसल्याने लोकशाहीसह जगातील सर्व व्यवस्था अडचणीत आल्या आहेत, असे मत ज्येष्ठ पत्रकार व अभ्यासक निळू दामले यांनी व्यक्त केले.

विवेकधारा संस्थेच्या वतीने शहीद भगतसिंग स्मृतिदिनानिमित्त आयोजित सहाव्या नास्तिक मेळाव्यात दामले बोलत होते. कुसुमाग्रज स्मारक येथे रविवारी (दि. 22) हा मेळावा झाला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सल्लागार लोकेश शेवडे यांनी ‘श्रद्धा आणि जागतिक राजकारण’ या विषयावर दामले यांची मुलाखत घेतली. त्यात दामले यांनी आस्तिकता-नास्तिकता, जागतिक स्तरावरील धर्मवाद, राजकारण, शक्तिशाली नेत्यांचा उदय आदी विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘देव-धर्माला आव्हान देणे, प्रश्न विचारत राहणे नास्तिकतेशी संबंधित आहे. धर्म व राजकारण मात्र या गोष्टीची मुभा देत नाही. भारतात नव्वद टक्के लोक नास्तिक आहेत, असे म्हणावे लागेल. कारण मंदिराचे कळस कापून नेणे, चोरीचे पैसे देवाला वाहणे यांसारख्या देव व धर्मसंमत नसलेल्या गोष्टी ते करत असतात. गेल्या दहा वर्षांत देव व धर्माची जागा राजकारणाने घेतली आहे. लोकांच्या जगण्याचे आधार देव नव्हे, तर राजकीय नेते होत आहेत. लोकांना क्षुल्लक गरजांच्या पूर्ततेसाठीही राजकारण्यांकडे जावे लागण्याची राजकीय, आर्थिक व्यवस्था जगात निर्माण झाली आहे. म्हणून ट्रम्प, नेत्यान्याहूंसारखे नेते शक्तिशाली होत आहेत. जगणे जसजसे कठीण होत चालले आहे, तशी देवाची गरज वाढत चालली आहे. श्रेष्ठत्व हाच कोणत्याही धर्माचा आधार असून, त्यातून अन्य धर्मीयांचा द्वेष केला जातो. समाजमाध्यमांमुळे या द्वेषात वाढ होत असून, राजकारण्यांनी प्रश्न विचारणेच संपवले आहे.’
मेळाव्याच्या प्रारंभी डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या भाषणाची ध्वनिफीत ऐकवण्यात आली. प्रा. मिलिंद मुरुगकर यांनी प्रास्ताविकातून मेळाव्यामागील भूमिका विशद केली. अपूर्व इंगळे यांनी नास्तिकांच्या जाहीरनाम्याचे वाचन केले. योगेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. अमित जोजारे यांनी समारोपाचे मनोगत व्यक्त केले, तर सुकृत कुलकर्णी यांनी आभार मानले.

डॉ. अंजली जोशी यांचे सादरीकरण
मेळाव्यात मानसोपचारतज्ज्ञ व लेखिका डॉ. अंजली जोशी यांनी ‘ईश्वरश्रद्धा आणि मानसिक आरोग्य’ या विषयावर सादरीकरण केले. त्यांनी ईश्वरश्रद्धेची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून चिकित्सा केली. मानसिकदृष्ट्या निरोगीपणाची वैशिष्ट्ये सांगत आस्तिक व नास्तिक व्यक्तिमत्त्वांच्या वर्तणुकीतील फरक स्पष्ट केला. ईश्वरश्रद्धा न बाळगणार्‍या व्यक्ती वस्तुनिष्ठपणे विचार करतात, असे त्या म्हणाल्या.

All systems, including democracy, are in danger: Nilu Damle

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

7 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

7 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

7 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

7 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

7 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

7 hours ago