नाशिक

नांदुरी-अभोणा रस्त्यावर कार दरीत कोसळली; डॉक्टर बचावले

कळवण : प्रतिनिधी
कळवण तालुक्यातील नांदुरी-अभोणा मार्गावरील चिंचबारी परिसरात आज सकाळी अकराच्या सुमारास एक गंभीर अपघाताची घटना घडली. कनाशी येथील सुखकर्ता हॉस्पिटलचे डॉ. किशोर देसले हे नाशिकहून आपल्या क्लिनिककडे परत येत असताना मोहनदरी फाट्याजवळील तीव्र उताराच्या वळणावर त्यांची सुझुकी ब्रिझा कार (क्र. 41/ 4167) रस्त्याच्या कडेला घसरून थेट दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की गाडीचा पूर्णतः चक्काचूर झाला.
समोरून येणार्‍या अवजड वाहनांचा अंदाज न आल्याने व रस्त्याच्या कडेचा तोल गेला असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जाते. मात्र नशिब बलवत्तर ठरल्याने डॉक्टर देसले हे या भीषण अपघातातून सुखरूप बचावले असून त्यांना फक्त किरकोळ खरचटल्याच्या जखमा झाल्या आहेत.
अपघाताची माहिती मिळताच अभोणा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीदेखील मदतकार्य करून डॉक्टरांना सुरक्षित बाहेर काढले. चिंचबारी परिसरातील हा रस्ता अतिशय धोकादायक असून यापूर्वीही अनेक अपघात येथे घडले आहेत. या घटनेमुळे रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

 

Editorial Team

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago