सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक-मुंबई महामार्गावरील लेखानगर परिसरातील उड्डाणपुलावर बुधवारी सकाळी 12 वाजेच्या सुमारास गंभीर अपघात घडला. पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट दुभाजकावर व विद्युत पोलवर आदळली.
या अपघातात चालक जखमी झाला असून, कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात होताच परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी चालकाला रुग्णालयात हलवले आणि वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, उड्डाणपुलावर पावसाच्या पाण्याची निकृष्ट निचरा व्यवस्था आणि देखरेखीअभावी असे अपघात वारंवार घडत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…