महाराष्ट्र

गांजाची वाहतूक करणारे दोघे ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलिसांची कारवाई

सिन्नर : प्रतिनिधी
गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरीत्या वाहतूक करणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात वाहनाला ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून 60 हजार रुपये किमतीचा दोन किलो गांजा व दुचाकी जप्त करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना सोमवारी (दि.26) नाशिक- पुणे महामार्गावर गांजाची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती.
नाशिक – पुणे महामार्गावर सिन्नर शहराच्या दिशेने दुचाकीवर दोन जण अवैधरीत्या गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, कर्मचारी नवनाथ सानप, विनोद टिळे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, कर्मचारी प्रकाश उंबरकर, रुपेश शिंदे त्यांनी सापळा रचला आणि संशयित अलगद जाळ्यात सापडले.
मस्प्लेंडर मोटरसायकलवर जाणारे अरबाज नासीर पठाण (वय 22, रा. सुकदेवनगर, पाथर्डीगाव, नाशिक) आणि किरण मानप्पा बडगेर (23, रा. पवार हाउस, अंबड, नाशिक) यांंना ताब्यात घेतले.
त्यांच्या ताब्यातून 60 हजार रुपयांचा सुमारे तीन किलो गांजा व स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण 90 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हे दोघेही बेकायदेशीररीत्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करण्याचे उद्देशाने वाहतक करताना सापडले. त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

4 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

4 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

4 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

4 hours ago