नाशिक

लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगबग

दिंडोरी ः प्रतिनिधी
ग्रामीण भागात न्याहारी करताना ताटात लोणचे असल्याशिवाय तोंडाला चव येत नाही. वरुणराजाची हजेरी लागण्यापूर्वीच लोणचे बनविण्यासाठी ग्रामीण भागात गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. पण, दिवसेंदिवस गावरान आम्रवृक्षांची कत्तल होऊन कलमीकरणाकडे सर्वांचाच ओढा वाढल्याने बाजारात गावरान कैर्‍यांची आवक जेमतेम दिसून येते. परिणामी, त्यांचे भाव वधारले आहेत. त्यामुळे लोणचे तयार करण्यासाठी लागणार्‍या गावरान कैर्‍या आंबट झाल्याचे चित्र बाजारात
पाहावयास मिळते.
दिंडोरी तालुका शेतीप्रधान म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागात पावसाळा व हिवाळा ऋतूत कष्टकरी शेतकरी राजा हा दररोजच्या जेवणासोबत आंब्याच्या लोणच्याचा वापर करतो. भोजनाचा स्वाद वाढविण्यासाठी लोणच्यावर अधिक भर दिला जातो. शेतावर जाणारे मजूर, कामगार, कष्टकरी भाकरी-ठेच्यासोबत लोणच्याला पसंती देतात. सध्या गृहिणी पेरणीला वेग येण्यापूर्वी कैरीचे लोणचे बनविण्यासाठीची घाई करत आहेत. त्यामुळे पुरुष मंडळींना बाजारातून कैर्‍या आणण्याचे ‘फर्मान’ सोडताना दिसतात. महिला कैर्‍यांसोबतच लोणचे साठविण्यासाठी चिनीमातीच्या बरण्या खरेदी करताना दिसत आहेत.
लोणचे घातल्यावर ते चांगले मुरावे म्हणून चिनीमातीच्या बरणीत ठेवावे लागते. त्याने लोणचे अधिक चवदार बनते. कैर्‍या खरेदीपासून तर लोणचे तयार होईपर्यंत यंदा मोठा खर्च येत असल्याने लाडक्या बहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

लोणचे घालण्यासाठी वापरात येणारे मसालेही यंदा महागले आहेत. कैरीचे लोणचे तयार करण्यासाठी लागणारी मोहरी, हळद, मीठ, तेल, तिखट, लसूण, मिरी, लवंग, मेथी, तीळ आदींच्या दरातही वाढ झाली आहे. कैर्‍यांचेही दर वाढून लोणच्याची चव महागली आहे, पण भोजनाचा आस्वाद लोणच्याअभावी हरवल्यागत आहे. बाजारातील तयार लोणच्याचे दरही परवडणारे नाहीत.
– रेणुका प्रमोद ठेपणे, गृहिणी, नाशिक

लोणचे तयार करण्यासाठी गावरान आंब्यासह प्रामुख्याने घोटी, तोतापुरी, वाटी, खोबरं या नावाच्या कैर्‍या वापरण्यात जुन्या जाणकार गृहिणी पसंती देतात. घरात लोणचे बनवताना स्वच्छतेवर चांगला भर दिला जातो. अनेक प्रकारची लोणची आज बाजारात उपलब्ध आहेत, पण घरी बनवलेल्या कैरीच्या लोणच्याची चवच न्यारी असते.
– प्रमिला संदीप गावंडे, गृहिणी, चाचडगाव

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago