नाशिक

चेन स्नॅचिंग करणारी टोळी गजाआड

डुबेरेवाडी, कासारवाडीतील दोन गुन्ह्यांची उकल; तिघांना अटक

सिन्नर : प्रतिनिधी
डुबेरेवाडी आणि कासारवाडी परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पसार होणार्‍या टोळीला सिन्नर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने केलेल्या कारवाईत तीन सराईत आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि तीन मोबाइल असा एकूण 2 लाख 48 हजार 95 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी रवींद्र प्रभाकर धोक्रट (27, रा. सोमठाणे), किरण मनोज पटेल (27, रा. ब्राह्मणवाडे, ता. निफाड) आणि सागर रवींद्र कदम (27, रा. कदम मळा, सोमठाणे) यांना अटक करण्यात आली आहे.
सिन्नर व वावी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्यांनी डुबेरेवाडी आणि कासारवाडी येथे प्रत्येकी एक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावल्याची कबुली दिली. कासारवाडी येथील महिलेच्या गळ्यातून दागिने ओरबाडून काढली. यामुळे तिच्या कानालाही जखम झाली होती.
पोलिसांनी आरोपींकडून सुमारे एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे डोरले, कानातील दागिने, एमएच-15 केआर-3269 क्रमांकाची मोटारसायकल तसेच तीन मोबाइल जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 2 लाख 48 हजार 95 रुपये इतकी आहे. तपासादरम्यान मुख्य आरोपी रवींद्र धोक्रट याच्याविरुद्ध सिन्नर एमआयडीसी, सिन्नर, कोपरगाव तालुका आणि कोपरगाव शहर पोलीस ठाण्यांत चोरी, मारामारी तसेच दरोड्याच्या तयारीचे पाच गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एस. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब गाढवे तसेच नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाणे आणि आप्पासाहेब काकड यांनी सहभाग घेतला.

Chain snatching gang in Gajaad

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

16 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

16 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

16 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

16 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

17 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

17 hours ago