नाशिक

राहुडला गायरानावर 35 हजार वृक्षांची हरितक्रांती

‘राह’ फाउंडेशन, ग्रामपंचायतीचा उपक्रम; सिंचनासाठी तीन शेततळ्यांची उभारणी

दिघवद : वार्ताहर
हवामान बदल, भूजल पातळीतील घट आणि जैवविविधतेसमोरील संकटावर मात करण्यासाठी चांदवड तालुक्यातील राहुड येथे पर्यावरण संवर्धनाचे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. राहुड गावच्या 69 हेक्टर गायरान क्षेत्रावर तब्बल 35 हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात येत असून, मुंबईच्या ‘राह’ फाउंडेशनने पुढील पाच वर्षे या वृक्षांचे संगोपन व संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
चांदवडचे गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी छोटू थोरात, विस्तार अधिकारी किशोर लोहार, वाल्मिक पवार, ग्रामसेवक योगेश माळी तसेच ‘राह’ फाउंडेशनचे तुषार पिंगळे व अतुल देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चांदवड करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.
या प्रकल्पांतर्गत ऐन, अंजन, आंबा, चिंच, आवळा, बांबू, कडुनिंब, करंज, सीताफळ यांसह 32 विविध प्रजातींच्या स्थानिक व औषधी वृक्षांची लागवड केली जात आहे.
व्हीबीजी रामजी योजनेंतर्गत व स्थानिक मजुरांच्या सहभागातून हा उपक्रम साकार होत असून, ‘राह’ फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. सारिका कुलकर्णी, शरयू कामत, तुषार पिंगळे व अतुल देवरे यांनी या प्रकल्पाची संकल्पना मांडली आहे.

शाश्वत जलव्यवस्थापन
वृक्षांच्या संगोपनासाठी व उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी परिसरात तीन शेततळ्यांची उभारणी करण्यात आली आहे. यात 10010 परिमाणाची दोन आणि 8080 परिमाणाचे एक शेततळे तयार करण्यात आले असून, यामुळे वृक्षांना वर्षभर पाणी मिळण्यासोबतच भूजल पुनर्भरणाला मोठा हातभार लागणार आहे.

A ‘Green Revolution’ of 35,000 trees on the grazing land at Rahud.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

17 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

17 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

17 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

17 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

17 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

18 hours ago