महिला आयोग अध्यक्षपदाचा चाकणकर यांचा राजीनामा

कॅप्टन अशोक खरात प्रकरण भोवले;मुख्यमंत्र्यांनी दिला होता आदेश

मुंबई : शेकडो महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्यामुळे अडचणीत आलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर सर्व स्तरांतून जोरदार टीका झाल्यानंतर अखेर त्यांनी आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी त्या मुंबईत आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबरोबरच त्यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे.

नाशिकमधील हायप्रोफाइल भोंदू कॅप्टन अशोक खरात याच्यासोबत व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमुळे चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली होती. उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे, रूपाली पाटील ठोंबरे, छत्रपती संभाजीराजे, अंजली दमानिया यांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. या प्रकरणात दबाव वाढल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागणार आहे. रूपाली चाकणकर या अशोक खरातने स्थापन केलेल्या शिवानिका ट्रस्टच्या संचालिका आहेत. गेल्या वर्षी एका महिलेच्या लैंगिक छळ प्रकरणी रुपाली चाकणकरांनी त्या महिलेला मदत करण्याऐवजी अशोक खरातला मदत केल्याचं समोर आलं. त्यामुळे अशोक खरातवर चाकणकरांचा राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सुरू झाली. रुपाली चाकणकरांनी या प्रकरणात राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानतंर रुपाली चाकणकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना राजीनामा देण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. त्यानतंर चाकणकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या दोन्ही भेटीनंतर रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाला. रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आज राष्ट्रवादीची बैठक बोलावण्यात आली आहे.

अशोक खरातसोबत व्हिडिओ, फोटो व्हायरल

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा अशोक खरातसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये रूपाली चाकणकर या अशोक खरातची पाद्यपूजा करताना दिसत आहेत. दुसर्‍या एका व्हिडिओमध्ये चाकणकर या अशोक खरातला थेट विठ्ठलाची उपमा देताना दिसत आहेत. सोबतच चाकणकर व अशोक खरात यांचे काही फोटोही व्हायरल झाले.

 

 

 

Chakankar resigns as Women’s Commission chairperson

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *