नाशिक

मनपा महासभेत गोंधळ; ‘राजदंड’ पळवण्याचा प्रयत्न

अंदाजपत्रक सादर करताना सत्ताधारी भाजपा व राष्ट्रवादीत मतभेद

नाशिक : प्रतिनिधी
सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देणारे तथा सत्ताधारी पक्षाबरोबर युती करून सत्तेत सहभागी झालेले कोणतेही पक्ष आपल्यालाही योग्य मानसन्मान मिळावा, आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, तसेच योग्य प्रकारे निधी मिळावा, अशी मागणी करत असतात. मात्र, त्याची प्रमुख सत्ताधारी पक्षाकडून पूर्तता न झाल्यास नाराजी वेळोवेळी उघड होते. सोमवारीही (दि. 30) नाशिक महापालिकेच्या महासभेत अंदाजपत्रक सादर करताना ही नाराजी तथा मतभेद उघड झाल्याचे दिसले.

महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेमध्ये स्मारकासाठी तरतूद तसेच निधीमध्ये असलेल्या तफावती यावरून सत्ताधारी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या नगरसेवकांनी मोठा गदारोळ घातला. यावेळी महापौरांचा राजदंड पळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला; परंतु सुरक्षारक्षक आणि कर्मचार्‍यांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न हाणून पाडला. या गोंधळामुळे अंदाजपत्रकीय महासभा चांगलीच वादळी ठरली .
नाशिक महानगरपालिकेचे सन 2026-27 चे अंदाजपत्रक स्थायी समितीच्या वतीने सादर करण्यात येणार होते. त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेमध्ये विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या सिडकोतील स्मारकासाठी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, निधीच्या तफावतीच्या मुद्द्यावरून शिवसेना उबाठा गटानेही पोस्टरबाजी करत सत्ताधार्‍यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.
या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काही विरोधी नगरसेवकांनी महापौरांचा ‘राजदंड’ पळवण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. प्रशासन आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे काही काळासाठी सभा स्थगित करण्यात आली होती. यानंतर परिस्थिती निवळल्यावर सभा पुन्हा सुरू करण्यात आली. या प्रकारामुळे सभागृहाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसले.

उद्धव ठाकरे आणि अजित पवार गटाचे नगरसेवक आक्रमक

महापालिकेत समान निधी वाटप होत नसल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी पोस्टर हातात घेत सभागृहात घोषणाबाजी केली. यावेळी ‘विरोधकांना निधी अर्धा देत असाल तर नागरिकांचा करदेखील अर्धा करा’, जनतेच्या पैशात भेदभाव आम्हाला मान्य नाही, मनपाची मनमानी चालणार नाही, अशा आशयाचे पोस्टर झळकावत निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी अजित पवारांच्या स्मारकासाठी अंदाजपत्रकात तरतूद करावी, अशी मागणी केली. विशेष म्हणजे, यापूर्वीदेखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला समर्थन देणारे अपक्ष नगरसेवक आणि भाजपाचे तिकीट नाकारलेले मुकेश शहाणे यांनी याबाबत निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. त्यांनी तसे पत्रही दिले होते. हे सर्व असतानादेखील अंदाजपत्रकाच्या पुस्तकात याबाबत तरतूद न दिसल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी महापौरांना घेरण्याचा जो प्रयत्न केला तो बघितल्यानंतर सत्ताधारी भाजपा व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल आहे, हा जो देखावा उभा केला जात होता तो पूर्णपणे खोटा असल्याचे समोर आले आहे.

Chaos in Municipal General Assembly; Attempt to snatch ‘scepter’

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago