आस्वाद

घर स्वप्नातले..

मनी वसे स्वप्नी दिसे वर बरसे रिमझिम पावसाची सर. सुंदर, स्वच्छ न्हाऊन निघाले त्यात माझे घर. गेट उघडता दिसे भव्य अशी रांगोळी. छोट्याश्या आवारात फळझाडांसोबत तुळशीवृदावनाची सेटिंग. टू-व्हीलर, फोर-व्हीलर लावण्यासाठी होती तिथे पार्किंग. काही क्षण अनुभवले मी फिलिंग लाइक अ किंग. प्रवेशद्वारावर दिसे मनमोहक तोरण. पहिले पाऊल टाकून घरात केले पदार्पण. घरात प्रवेशिता दिसे दिसे, भव्य हॉल. उत्तम प्रकारे रंगरंगोटी केलेल्या सुंदर अशा वॉल. चहूबाजूच्या खिडक्यांनी नैसर्गिकरीत्या प्रकाशमान. सोफे होते आलिशान. टीव्ही युनिट दिसत होते फारच छान. बोलके होते फर्निचर. लोंबकळत होते झुंबर. पंखा, एसी सोबत आकर्षित फुलदाणीने सेट सेंटर टेबल. हे सगळं बघून वाटत होते कम्फर्टेबल. थोडे चालून डावीकडे जाता दिसे देवघर. छान होता देव्हारा. त्याला कलाकुसरीसोबत होती सुंदर मखर. दिसत होते सगळीकडे विविध लाइटचे प्रकार. वाटत होते स्वप्न झाले साकार. थोडे चालून उजवीकडे जाता दिसे स्वयंपाकघर. शेगडी, मिक्सर, फ्रिजसोबत ओव्हन अन त्यात डाइनिंग टेबलची भर. किचन होते मॉड्यूलर एव्हरीथिंग इज सेट परफेक्ट अ‍ॅण्ड पर्टीक्युलर. त्याला जोडून होती गैलरी तिथे जाता कोण कोण आहे घरात विचारपूस करतील शेजारी. तिथेच धुणे भांडे करण्याची मोरी. थोडे पूढे जाता दिसे स्टडी रुम पहिली बेडरुम. मित्र सवंगडी अन् पाहुण्यांसाठीच असते ती बड्डी रूम तिथे असलेल्या खिडकीतून गच्चीत डोकवता दिसे छोटेसे गार्डन. फुलझाडांचा बहर बघून कमी झाले मनावरचे बर्डन. थोडी पुढे जाता दिसे दुसरी बेडरूम तिथे बेड होता थाटात. होते नीटनेटके आवरलेले चार ते पाच कपाट. अंथरुण बघून पांघरूण घेऊन काढावी मनसोक्त झोप. करूनी विचार मनी याचसाठी केला होता का सर्व खटाटोप. वॉशरूम, बाथरूम वापरून मन आणि तन झाले रिफ्रेश थकवा,ताणतणाव विसरुन वाटले प्रसन्न कमी झाला स्ट्रेस. मधोमध घराच्या आहे एक झोका. अनुभवावा काही क्षण टाईमपास अन विरंगुळा.आहे एकमजल चढण्यासाठी जीना.कधी चढतो, कधी टाळतो इथे चालते तर, तर चालत नाही मर्जीना. वाळवणासाठी आहे गच्ची पण तिथे ती एकटी वसति. पाण्याची टाकी. असते पूर्ण घर तिच्यावर निर्भर. चेक करावी लागते वेळोवेळी तिची पातळी. नीटनेटके आवरून आरशात बघून मेकअप करून सेट केले केस. योग्य वेळेत निघालो तर होणार नाही लेट. असे म्हणत टिफीन घेऊन निघालो घराबाहेर उघडून घराचे गेट, पाहून स्वतःच्या नावाची नेमप्लेट. डोळे उघडून अचानक स्वप्नातील कल्पनेतील विश्वातून निघून झाली वास्तवाशी भेट. ये तो हैं किराए का मकान, न जाने मालीक कब कह दे खाली करो समेटो अपना सामान. नशिबातच असावे लागते घर. घर बघावे बांधून म्हण होती आयुष्याचा सार जपून. हवे असते वडिलोपार्जित, हवी असते पूर्वपुण्याई मेहनत, कष्ट परिश्रम करून, कर्ज काढूनही पणाला लावावी लागते आयुष्यभराची कमाई. हात जोडून देवाजवळ केली मी प्रार्थना… देवा, होऊ दे होऊ दे माझे छान सुंदर घर अस्तित्वात साकारलेले संकल्पनेतील भवन. देव म्हणाला, वत्सा, तू चांगले कर्म कर. जर या जन्मी नाही झाले तर पुढच्या जन्मी होईल नक्कीच तुझे घर. हे तर स्वप्न होते, पण सत्यात नाही होत लवकरात लवकर घर. आयुष्यात कितीही करा तुम्ही सेव्हिंग, त्याग अन् समर्पण….

The house is in a dream..

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

18 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago