छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू नव्हते ; सुभान शेख
मनमाड : आमिन शेख
– छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे शत्रू होते असा खोटा इतिहास आपल्याला सांगितला जातो आणि या खोट्याच्या जोरावर राज्या देशात हिंदू मुस्लिम दंगली पेटवण्याचे काम सध्याचे राजकारणी करत आहेत जर छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक प्रमुख खात्यांच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या या मुस्लिम सरदारांकडे कशा होत्या या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे मी म्हणतो म्हणून तुम्ही ऐकू नका तर इतिहासात दिलेले दाखले पुस्तकाद्वारे आपल्याला उपलब्ध आहेत ते वाचा आणि आजकालच्या या ढोंगी राजकारण्यांपासून सावध राहा हे कधीही हिंदू मुस्लिम वाद पेटवू शकतील मुळात जे तुम्हाला हिंदू मुस्लिम हा द्वेष करायला शिकवतात त्यांचा इतिहास उचकून बघा त्यांच्या घरातील कोणी त्यांचा वंशज छत्रपती शिवाजी महाराजांकडे होता का जर नसेल तर ते नक्कीच मोगल आणि औरंगजेबाकडे असतील यामुळेच ते तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू आहेत असे सांगत आहेत असे स्पष्ट मत दंगा मुक्त महाराष्ट्राचे प्रमुख तसेच शिवव्याख्याते सुभान शेख यांनी व्यक्त केले मनमाड येथील फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती तसेच कुळवाडीभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी त्यांनी ऐतिहासिक दाखले देत सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर देखील भाष्य केले. आग्र्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांची सुटका करण्यासाठी मदारी मेहतर याने मोलाची भूमिका बजावली त्यांनी जर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गद्दारी केली असती तर त्याला किती खोके मिळाली असते असा सवाल त्यांनी उपस्थित केला यावेळी एकच भाषा पिकला व पन्नास खोके एकदम ओके असा आवाज गर्दीतून आला मला अभिमान आहे की मी मराठी मुसलमान आहे आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळेच आज मी पुराना मधील उर्दू श्लोकांचे तुम्हाला मराठीत अनुवादन करून सांगत आहे कारण तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी कुराणाचे मराठी भाषेत रूपांतर करण्यासाठी पंचवीस हजार रुपये दिले होते आजचे 2500 कोटी रुपये आहेत तेव्हा त्यांनी भेदभाव केला नाही तर तुम्ही आम्ही भेदभाव करणारे कोण असेही सुभान शेख म्हणाले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थापक राजेंद्र पगारे हे होते तर स्वागत अध्यक्ष मंच अध्यक्ष मिर्झा अहमद बेग हे उपस्थित होते
यावेळी शेख सुभान यांनी अनेक खोट्या इतिहासाबद्दल भाष्य केले छत्रपती संभाजी राजा बद्दल देखील बदनामीचे कटकारस्थान काही लोकांकडून सुरू आहे मात्र आपण यांच्या भूलथापाला बळी न पडता आपला एकोपा जपून ठेवावा छत्रपती शिवरायांना समता बंधुता आणि न्याय असे राज्य अपेक्षित होते आणि तेच राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान देऊन स्थापित केले आपणही त्याच संविधानाच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर समता बंधुता आणि न्याय असे राज्य स्थापित करूया सध्याच्या राजकारण्यांना बळी न पडता हिंदू मुस्लिम तसेच बहुजन प्रति राज्य अनुसरावे असे मत व्यक्त केले यावेळी फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे देण्यात येणारा कुळवाडी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला शैक्षणिक क्षेत्रात सेंट झेवियर हायस्कूलचे अनिल निकाळे कामगार क्षेत्रात कॉम्रेड रामदास पगारे सामाजिक क्षेत्रात शरद बहोत तर क्रीडा क्षेत्रात मुस्ताक शेख यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले यावेळी मंचावर भाजप शहराध्यक्ष संदीप नरवाडे युवा उद्योजक उमेश लालवानी माजी नगराध्यक्ष सादिक तांबोळी माजी नगरसेवक अमिन पटेल पवन रॉय संजय कटारे नगर रचना अभियंता अझहर शेख हाजी शफी शेख कामगार नेते प्रदीप गायकवाड सतीश केदारे गणेश हडपे सलमान आत्तार सुरज अरोरा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवजयंतीनिमित्त झेंडे लावत असताना शहरातील दोन तरुणांचा मृत्यू झाला तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद यांचा अपघाती मृत्यू झाला यानिमित्ताने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक फिरोज शेख यांनी केली सुरुवातीला प्राध्यापक विनोद अहिरे यांचा स्वर संबोधी हा शाहीर जलसा संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास अहिरे यांनी केले तर आभार शकूर शेख यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सद्दाम आतार जावेद शेख इस्माईल पठाण जाकिर पठाण यांच्यासह इतर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले
मदारी मेहतर प्रामाणिक
छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते बहुजन प्रतिपालक म्हणून त्यांना संबोधले जायचे साळे माळी कोळी मांग बौद्ध यासह 18 पगड जातीचे नेतृत्व करत होते त्यांच्या काळी हिंदू मुस्लिम यांच्यासह सर्वच एकोप्याने राहायची आज-काल गद्दारी करण्याची व पाठीत खंजीर खुपसण्याची सवय महाराष्ट्राला लागली आहे आर्थिक लाभासाठी किंवा राजकीय पदासाठी पाठीत खंजीर खुपसण्याची पद्धत महाराष्ट्रात सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असणारे मावळे हे प्रामाणिक होते जर तेव्हा आग्र्यावरून सुटका होताना मदारी मेहतरणे गद्दारी केली असती तर त्याला किती खोके मिळाली असते असे म्हणतात मोठा हशा पिकला
नाशिक: प्रतिनिधी नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्याविरोधात चुंबळे गटाने अविश्वास ठराव आणला आहे.…
पोलिसांचा छापा ,गैरकृत्य करणारे महाविद्यालयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात सिडको विशेष प्रतिनिधी सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील…
पुणे: संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या स्वारगेट येथील बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी दत्तात्रेय गाडे याला…
सिडको: विशेष प्रतिनिधी मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोविंद नगर परिसरात सुरू असलेल्या एका इमारतीच्या…
मनमाडला गजानन महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात मनमाड (प्रतिनिधी) :- शेगावचे गजानन महाराज यांचा…
जिल्हा न्यायालयाबाहेर फ्री स्टाइल नणंद भावजयींनी झिंज्या उपटल्या सिडको : विशेष प्रतिनिधी पतीच्या निधनानंतर पत्नीने…