नाशिकरोड : गोरख काळे
शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे नाशिक दौर्यावर येऊन गेल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही महिन्याच्या अखेरीला नाशिक दौर्यावर येत असून, अद्याप तारीख निश्चित झालेली नसली तरी 30 तारखेला येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या दौर्यात ते नाशिकच्या विकासकामांचा आढावा घेणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्याची घोषणा शिंदे यांनी केली होती. त्यामुळे आपल्या दौर्याची सुरुवात नाशिकमधून करणार असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार आणि बारा खासदार फोडल्यानंतर त्यांच्या गटात येणार्या पदाधिकार्यांची व शिवसैनिकांची संख्या वाढत आहे. नाशिकमधून आ. दादा भुसे आणि सुहास कांदे व खा. हेमंत गोडसे हे तिघे सहभागी झाले आहेत. याव्यतिरिक्त शिवसेनेचा एकही पदाधिकारी नाशिकमधून शिंदे गटात गेलेला नाही. उलट आदित्य ठाकरे यांच्या दौर्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर कालच नाशिकचे व मालेगावचे माजी नगरसेवक मातोश्रीवर गेले होते. त्यांनी आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले. त्यामुळे नाशिकमधून शिंदे यांना किती प्रतिसाद मिळतो, याकडे राजकीय मंडळींचे लक्ष लागून आहे. काही पदाधिकारी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर नाशिक दौर्यावर येणार्या शिंदे यांच्या दौर्यात कोण कोण सहभागी होते, याकडे लक्ष लागले आहे.
दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…
स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…
नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…
बलात्काराच्या घटनेने नाशिक हादरले पतीला जामीन मिळवून देण्याचा बहाणा करून युवतीवर अत्याचार नाशिक :प्रतिनिधी…
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक नाशिक: प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदक…
संजय दराडेंच्या रूपाने मखमलाबादच्या शिरपेचात तुरा " मखमलाबादचे भूमिपुत्र संजय दराडे यांना गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती…