संततधारेमुळे गोदेच्या पातळीत पुन्हा वाढ

नाशिक : देवयानी सोनार
शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. गंगापूर धरणात पाणीसाठा वाढल्याने कालपासून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वरपर्यंत पाणीपातळी पोहोचली आहे. दारणा धरण क्षेत्रातही पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने दारणामधूनही पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
पावसाने मागील दोन-तीन दिवस उघडीप दिली होती. सर्वत्र कडक उन्हाळ्यासारखे ऊन पडले होते. मात्र, काल रात्रीपासून पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाल्याने कालपासून गंगापूर धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. गंगापूर धरणामध्ये यंदा लवकर पाणीसाठा वाढला आहे. सध्या गंगापूर धरणाचा साठा 65 टक्क्यांच्या वर गेला आहे. जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठाही वाढला असून, पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून 3486 तर दारणातून 7515 क्सूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीला पुन्हा एकदा पूर आला आहे. गोदावरीच्या पातळीत वाढ होऊ लागताच नागरिक आणि या भागातील व्यावसायिक सतर्क झाले आहेत. प्रशासनानेही खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.
नांदूरमध्यमेश्‍वरमधूनही विसर्ग
दारणा आणि गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नांदूरमध्यमेश्‍वर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. नांदूरमध्यमेश्‍वर परिसरातील शेती गोदावरीला आलेल्या पुरामुळे पाण्यात गेली आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago