मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्याचप्रमाणे विधानपरिषद सदस्यत्वाचाही उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत असल्याचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सत्ता नाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत सत्ता नाट्याला पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे राज्याचे नवीन सरकारच्या सत्तास्थपनेचा मार्ग मोकळा झाला आहे.