राशिभविष्य

गुरूवार, ३० जून २०२२.

आषाढ शुक्ल प्रतिपदा. दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००

“आज उत्तम दिवस, *गुरुपुष्यमृत* ‘ध्रुव’ योग आहे.”

चंद्र नक्षत्र – पुनर्वसू

मेष:- घरात विनाकारण वाद होऊ शकतात. संयम बाळगा. मौल्यवान खरेदी होईल.

वृषभ:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. कर्जे मंजूर होतील. आवक वाढेल. संध्याकाळ नंतर अनुकूलता वाढेल.

मिथुन:- कामासाठी वेळ द्यावा लागेल. डोळ्याचा त्रास जाणवेल. आर्थिक नियोजन कोलमडू देऊ नका.

कर्क:- मन उदास राहू शकते. धार्मिक कार्यात सहभागी व्हा. ध्यानधारणा करा. क्रोध आवरा.

सिंह:- विनाकारण वाद नकोत. चुकीचे निर्णय होऊ शकतात. खर्चात वाढ संभवते.

कन्या:- सौख्य लाभेल. कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न राहील.

तुळ:- मन:स्वास्थ्य लाभेल. आनंदी राहाल. कामात उत्साह वाढेल. लाभ होतील.

वृश्चिक:- दूर प्रवासाचे बेत आखाल. शुभ समाचार समजतील. शेअर्स मधून लाभ संभवतो.

धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. दगदग वाढेल. श्री. दत्तगुरु उपासना करा.

मकर:- शत्रू पराभूत होतील. राजकारणात यश मिळेल. प्रगतीपथावर वाटचाल कराल.

कुंभ:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होणार आहेत. धाडसी निर्णय घ्याल.

मीन:- विनाकारण धाडस नको. विचारपूर्वक निर्णय घ्या. नात्यात संवाद साधा.

मंगेश पंचाक्षरी –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *