जुन्या भांडणातून टोळीयुद्धाचा पुन्हा भडका
सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड औद्योगिक वसाहतीतील संजीवनगर परिसरात पुन्हा एकदा दोन टोळींत जुना वाद चिघळल्याने मोठा हिंसाचार घडला. पूर्वीच्या भांडणाची कुरापत काढत एका टोळीतील सदस्यांनी दुसर्या टोळीवर कोयते व तलवारींनी हल्ला चढवून काही जणांना गंभीर जखमी केले. यासोबतच घरासमोर पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद फैसल वाहिद शेख (वय 28, रा. संजीवनगर, अंबड, नाशिक) हे रविवारी रात्रीच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळील रस्त्यावरून पायी जात असताना, चार मोटारसायकलीवरून आलेल्या 10 ते 12 टवाळखोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मोहम्मद फैसल यांच्या पाठीवर व कानावर गंभीर जखमा झाल्या. तसेच या टवाळखोरांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडीतदेखील दहशत माजवल्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर या हल्लेखोरांनी सिडकोतही अशाच प्रकारे धुमाकूळ घातल्याचे बोलले जाते आणि त्यानंतर त्यांनी संजीवनगरमध्ये वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली आहे.
यावेळी पादचारी मोहम्मद अमीरूल शेख यांच्यावरदेखील धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. तसेच साई रुद्र अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. या घटनेमुळे संजीवनगर परिसरात प्रचंड दहशत पसरली असून, नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…