नाशिक

वृद्धेच्या गळ्यातील सुमारे दीड लाखाची चेन तोडून चोर पसार

सिडको : विशेष प्रतिनिधी
द्वारका परिसरातील तपोवन रोडवरील अनुसयानगर भागात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन मोटारसायकलवरील दोघा अनोळखी व्यक्तींनी जबरदस्तीने खेचून चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अनिता सूर्यकांत जायस्वाल (वय 65, व्यवसाय – घरकाम, रा. देवदत्त रोहाऊस नं. 2, अनुसयानगर) या रात्री घराबाहेर खुर्ची टाकून बसलेल्या असताना यावेळी मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील अंदाजे दोन तोळ्याची सुमारे 1 लाख 50 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून नेली व घटनास्थळावरून
पलायन केले.
चोरी करणारे दोघेही हिंदी भाषिक असून, मोटारसायकलवर पुढे बसलेला व्यक्ती अंदाजे 35 वर्षांचा असून, त्याने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. तर मागे बसलेला व्यक्ती अंदाजे 30 वर्षांचा असून, त्याने काळ्या रंगाचा शर्ट घातलेला होता. या घटनेने परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सविता गवांदे करीत आहेत.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago