नाशिक

सिडकोत कोयत्याने मारहाण, वाहनांची तोडफोड

जुन्या भांडणातून टोळीयुद्धाचा पुन्हा भडका

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड औद्योगिक वसाहतीतील संजीवनगर परिसरात पुन्हा एकदा दोन टोळींत जुना वाद चिघळल्याने मोठा हिंसाचार घडला. पूर्वीच्या भांडणाची कुरापत काढत एका टोळीतील सदस्यांनी दुसर्‍या टोळीवर कोयते व तलवारींनी हल्ला चढवून काही जणांना गंभीर जखमी केले. यासोबतच घरासमोर पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद फैसल वाहिद शेख (वय 28, रा. संजीवनगर, अंबड, नाशिक) हे रविवारी रात्रीच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळील रस्त्यावरून पायी जात असताना, चार मोटारसायकलीवरून आलेल्या 10 ते 12 टवाळखोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मोहम्मद फैसल यांच्या पाठीवर व कानावर गंभीर जखमा झाल्या. तसेच या टवाळखोरांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडीतदेखील दहशत माजवल्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर या हल्लेखोरांनी सिडकोतही अशाच प्रकारे धुमाकूळ घातल्याचे बोलले जाते आणि त्यानंतर त्यांनी संजीवनगरमध्ये वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली आहे.
यावेळी पादचारी मोहम्मद अमीरूल शेख यांच्यावरदेखील धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. तसेच साई रुद्र अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. या घटनेमुळे संजीवनगर परिसरात प्रचंड दहशत पसरली असून, नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago