प्रभाग 24 मध्ये पाणीप्रश्न गंभीर
सिडको : विशेष प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक 24 मध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. कर्मयोगीनगर येथे बांधण्यात आलेल्या नवीन जलकुंभातून पाणीपुरवठा करून टंचाई दूर करा, अशी मागणी करीत बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, सत्कार्य फाउंडेशनसह नागरिकांनी मोर्चा काढला. जलकुंभावर चढून आंदोलन केले. महापालिका अधिकार्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गोविंदनगर, कर्मयोगीनगर, कालिका पार्क, जगतापनगर, जुने सिडकोसह प्रभाग 24 मध्ये गेल्या दोन वर्षांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. अनेकदा निवेदने देऊन रस्त्यावर उतरूनही ही समस्या सुटत नाही. सहा दिवसांपूर्वी महापालिका पाणीपुरवठा अधिकार्यांची भेट घेण्यात आली. तरीही यात सुधारणा झाली नाही. काल शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली हंडे, भांडे घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले. हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, पाणी चोरांवर कारवाई करा, पाणी नाही तर घरपट्टी-पाणीपट्टी नाही, अशा घोषणा देत नागरिक कर्मयोगीनगर येथील जलकुंभावर पोहोचले. जलकुंभावर चढून पाणीटंचाई दूर करण्याची मागणी करण्यात आली. महापालिका उपअभियंता हेमंत पठे, जितेंद्र चव्हाण, नाना गायकवाड, किरण साठे आदींनी आंदोलकांशी चर्चा केली. शिवसेना जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनीही या अधिकार्यांशी चर्चा केली. पाणीप्रश्न सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.
या आंदोलनात शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, प्रभाकर खैरनार, आनंदा तिडके, राजेश पाटील, बाळासाहेब राऊतराय, महेश जाधव, अविनाश कोठावदे, जयदीप पेंढारकर, देवीदास तांबोळी, विनोद पोळ, हेमंत नेरकर, किरण काळे, अशोक पाटील, साधना देशमुख, ज्योती देशमुख, योगिता गहिवड, रूपाली मुसळे, भारती चौधरी, अमृता नेरकर, शिल्पा मुळे, नंदिनी जाधव, विशाखा थोरात, अवनी कुलकर्णी, कविता कोठावदे, श्वेेता काळे, तेजस्विनी पवार, अनिता आमटे, संगीता देशमुख, रमेश शिंदे, प्रथमेश बडगुजर, योगेश नेरकर, प्रकाश देशमुख, शशिकांत मोरे, रामदास चौधरी, संग्राम देशमुख, अमोल विसपुते, हेमंत चव्हाण, पुरुषोत्तम शिरोडे, मनोज पाटील, राजेंद्र भुसारी, दत्तात्रय बाचकर, दत्तात्रय चासकर, संदीप गहिवड आदींसह नागरिक सहभागी
झाले होते.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…