नाशिक

शिवराज्याभिषेक सोहळ्याला जिल्ह्यातून हजारो शिवभक्त रायगडावर जाणार

समिती सदस्य करण गायकर यांची माहिती

नाशिक : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो शिवप्रेमी रायगडावर जाणार असल्याची माहिती भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगडचे सदस्य करण गायकर यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा यंदाही नेहमीप्रमाणे थाटात आणि जोशात साजरा होणार असून, या ऐतिहासिक सोहळ्यात सर्व शिवप्रेमी, मातृभूमीप्रेमी नागरिकांना सहकुटुंब या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन गायकर यांनी केले आहे.
युवराज छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या नेतृत्वाखाली व संयोगिता राजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली हा ऐतिहासिक दिवस दरवर्षी अत्यंत शिस्तबद्ध, भारावलेल्या वातावरणात, पारंपरिक ढंगात साजरा होतो.
याही वर्षी महाराष्ट्रभरातून हजारो शिवभक्त दुर्गराज रायगडावर दाखल होणार आहेत. या सोहळ्याला 6 जून रोजी नाशिक जिल्ह्याचा सहभाग यंदाही विशेष ठरणार आहे. ढोल-ताशा पथके, रणमैदानी खेळांचे सादरीकरण, छत्रपती शिवरायांना कवड्याच्या माळेचे अर्पण अशा विविध जबाबदार्‍या नाशिक जिल्ह्याच्या वतीने उत्साहाने पार पाडल्या जातात. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या वतीने रायगडाच्या पायथ्याशी मोफत अन्नछत्र उभारले जाते. जेथे येणार्‍या-जाणार्‍या भाविकांना भोजनाची सोय केली जाते.
5 व 6 जून या दोन दिवशी किल्ले रायगडावर विविध पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सोहळ्यात सहभागी होणार्‍या शिवभक्तांसाठी समितीच्या वतीने पार्किंग व्यवस्था, मार्गदर्शक नकाशे, आवश्यक सूचना आणि दिशानिर्देश सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सच्या माध्यमातून पुरवले जात आहेत. प्रत्येक शिवभक्ताने या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी विनंती समितीने केली आहे.

ही एक सुवर्णसंधी आहे. पराक्रमाचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्याची, छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार होण्याची आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याची. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज युवराज छत्रपती संभाजी महाराज हे उपस्थित सर्व शिवभक्तांंना दुर्गराज रायगडावर मार्गदर्शन करणार आहेत.
– करण गायकर, समिती सदस्य

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago