नाशिक

वाहतूक पोलिसांच्या जागी नागरिकच उतरले रस्त्यावर

 अनेक महिन्यांपासून वाहतूक कोंडीच्या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष…

वडाळागाव : प्रतिनिधी
वडाळा रोडवरील नंदिनी पुलावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, या ठिकाणी दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. विशेष म्हणजे, या महत्त्वाच्या मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती नसल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असताना परिसरातील काही जागरूक नागरिक स्वतःहून रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, नागरिकांच्या या प्रयत्नांनाही मर्यादा येत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे वाहनचालकांसह पादचार्‍यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या परिसरात अनेक रुग्णालये असून, काही ठिकाणी अतिदक्षता विभागाची सुविधाही उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना घेऊन जाणार्‍या रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकून पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांनाही याच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी होणारा विलंब मोठ्या संकटाला निमंत्रण देणारा ठरू शकतो.
वाहनांच्या गर्दीतून पायी जाणार्‍या नागरिकांनाही सुरक्षितपणे मार्ग काढणे कठीण झाले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. अनेक महिन्यांपासून ही समस्या कायम असतानाही संबंधित यंत्रणांकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत, ही खेदाची बाब असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. नागरिकांनी स्वतःहून वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी स्वीकारणे ही सामाजिक जाणिवेची बाब असली, तरी वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी नागरिकांवर सोपवून प्रशासनाला हात झटकता येणार नाही. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आपत्कालीन सेवांना अडथळामुक्त मार्ग मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे नंदिनी पुलावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीने सोडवून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

Citizens themselves took to the streets in place of traffic police

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

एक होती सुखद वनराई

- सुजाता येवले फळबियांच्या शोधात वृक्षावृक्षांत धावत होती, डोळ्यात आसवे आणत होती. दुरवर गेलेल्या सहचरांना…

7 hours ago

अनोळखी झालेली माणसं!

- अफजल पठाण कधीकाळी ज्यांच्याशिवाय दिवस सरत नव्हता, आज त्यांच्याशी बोलण्यासाठीही वेळ मागावा लागतो. एक…

7 hours ago

जलसंकटाची चाहूल : सामूहिक जबाबदारीचे भान

पाणी हेच जीवन आहे, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. परंतु, आज हेच जीवन संकटात…

8 hours ago

संभ्रम दूर करा

बारामतीत 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र…

8 hours ago

आयुष्याची घडी

रोजच्या जगण्यातलं ‘कपडे वाळत घालणं’ हे दिसायला अत्यंत साधं वाटणारं काम, पण या एका साध्या…

8 hours ago

हरवत चाललेली नात्यांची श्रीमंती!

घरं मोठी झाली, पण मनं छोटी कपडो की मॅचिंग बिठाने से सिर्फ शरीर सुंदर दिखेगा...…

8 hours ago