नाशिक : शहरातील विविध भागात राहणाऱ्या तिघांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे . याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे . आत्महत्या करणाऱ्यांमध्ये एका युवतीचा समावेश आहे . अरिंगळे मळा येथे राहणाऱ्या १६ वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . अश्विनी गोपाल असे मयत युवतीचे नाव आहे . ७ मे रोजी अश्विनी हिने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता , तीला घरच्यांनी उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले असता , डॉ . पाटील यांनी तीला तपासून मयत घोषित केले . दुसरी घटना कामटवाडे भागात घडली . येथे राहत असलेल्या महेश नथोबा भोसले ( वय ४६ ) यांनी आपल्या राहत्या घरी बेडरूममध्ये सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली . तिसरी घटना खुटवडनगर भागात घडली . या ठिकाणी राहत असलेल्या ओमप्रकाश विजय बहादूर सिंग ( वय ४० ) याने राहत्या घराच्या सिलिंगला असलेल्या लोखंडी हूकला कापडाच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली .