दहावी , बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार पहा..

दहावी , बारावी परीक्षेचा निकाल वेळेत लागणारमुंबई : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून , आता दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे . १० जूनपर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून , दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर केला जाईल , अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे . शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावत होती . परंतु , जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे . शेवटच्या पेपरच्या ६० दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे . यावेळी बारावीचा पेपर १५ दिवस उशिरा सुरू झाला . त्यामुळे आम्ही १० जूनपर्यंत निकाल जाहीर करू , असे बोर्डाने म्हटले . त्यानंतर दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *