नाशिक

सिटीलिंक प्रवाशांची सुट्ट्या पैशांच्या कटकटीतून सुटका

नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड प्रणाली कार्यान्वित

नाशिक : प्रतिनिधी
मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, कानपूर, पुणे आणि नागपूर या शहरांपाठोपाठ आता नाशिकमधील सिटीलिंकमध्ये नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. त्याद़ृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
प्रवाशांना सवलतीच्या दरातील पासेसची किंवा तत्काळ सुट्टे पैसे देऊन तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु बर्‍याचदा ऑनलाइन तिकीट काढताना अडचण येते किंवा सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होतात. आता या अडचणीतून लवकरच मुक्तता करण्याच्या तयारीत सिटीलिंक असून, त्यादृष्टीने पावलेदेखील उचलण्यात येत आहेत. हे असे कार्ड आहे की, जे प्रवासी डेबिट कार्डप्रमाणेदेखील वापरू शकतील. हे प्रीपेड कार्ड असणार असून, एकदा रिचार्ज केल्यास सदर कार्डच्या केवळ एका टॅपवर प्रवाशांना सिटीलिंकमधून प्रवास करता येणार आहे. नवीन वर्षात सिटीलिंक डिजिटल पेमेंट प्रणालीचा वापर करण्याच्या तयारीत असून, यासंदर्भात पावलेदेखील उचलण्यात येत आहेत. याबाबतची अद्ययावत माहिती येत्या काही दिवसांत सिटीलिंकमार्फत प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात येईल. सिटीलिंक कंपनीचा आपल्या स्थापनेपासूनच नाशिककर प्रवाशांंना अत्याधुनिक सोयी-सुविधा पुरविण्याकडे कायमच कल राहिला आहे. (अ‍ॅटोमॅटिक व्हेईकल लोकेशन सिस्टिम), (ऑटोमॅटिक
फेअर कलेक्शन सिस्टिम), (डेली मेन्टेनन्स सिस्टिम), (सर्व्हिस लीगल अ‍ॅग्रिमेंट), कार्ड यांसह विविध अत्याधुनिक प्रणालींचा वापर सध्या सिटीलिंकमार्फत करण्यात येत आहे. लवकरच आता आणखी एक प्रणालीची यात भर पडणार आहे.

कार्डचा मेट्रो, टोलप्लाझावरही उपयोग

भविष्यात नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचा केवळ बसच नाही, तर मेट्रो, टोलप्लाझा, पार्किंग यांसारख्या वाहतूक सेवांकरितादेखील या कार्डचा वापर करता येऊ शकतो. कार्डमुळे डिजिटल पेमेंटबरोबरच प्रवासी आणि वाहक पर्यायाने सिटीलिंकसोबत असलेले नाते अधिक दृढ होणार असल्याचे सिटीलिंकने म्हटले आहे.

Citylink passengers relieved of holiday money woes

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

9 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

10 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

10 hours ago