नाशिक

महिलांसाठी खुशखबर ! सिटी लिंकची आता लेडीज स्पेशल बस

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्यावतीने शहर बससेवा सुरू करण्यात  आली. शहर बससेवेला नाशिककरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. परिणामी हीच बाब लक्षात घेत सिंटीलिंक कंपनीच्यावतीने दोन मार्गावरील बस सेवा विस्तारीत करण्यात आली  तर तीन नवीन मार्गावर बस सेवा  सुरू करण्यात आली.  त्याचप्रमाणे उद्या मगंळवार ( दि.26) पासून विशेष स्वतंत्र  महिला बस सुरू करण्यात  येत आहे. शहरातील तीन मार्गांवर 8 फेर्‍यांच्या माध्यमातून या महिला विशेष बस धावणार आहे .पहिला  मार्ग क्रमांक 101 फेरी क्रमांक  1) गंगापूर गाव ते निमाणीमार्गे बारदान फाटा , सातपूर , सिव्हिल , निमाणी सकाळी 9 .30 वाजता … तर फेरी क्रमांक 2 ) निमाणी ते गंगापूर गाव मार्गे सिव्हिल , सातपूर , बारदान फाटा , गंगापूर गाव 18.00 वाजता . दुसरा मार्ग क्रमांक 103 फेरी क्रमांक 1 ) अंबडगाव ते निमाणी मार्गे सिम्बॉइसिस , उत्तमनगर , पवननगर , निमाणी सकाळी 9 .25 वाजता … तर फेरी क्रमांक 2 ) निमाणी ते अंबडगाव मार्गे पवननगर , उत्तमनगर , सिम्बॉइसिस , अंबडगाव 18.00 वाजता . तिसरा मार्ग क्रमांक 266 – फेरी क्रमांक 1 ) नाशिकरोड ते निमाणी मार्गे व्दारका , शालिमार , सिबीएस , निमाणी सकाळी 9 .30 वाजता तर फेरी क्रमांक 2 ) निमाणी ते नाशिकरोड मार्गे सिबीएस , शालिमार , व्दारका , नाशिकरोड सकाळी 9 .30 वाजता फेरी क्रमांक 3 ) नाशिकरोड ते निमाणी मार्गे व्दारका , शालिमार , सिबीएस , निमाणी 18.00 वाजता . तर फेरी क्रमांक 4 ) निमाणी ते नाशिकरोड मार्गे सिबीएस , शालिमार , व्दारका , नाशिकरोड 18.00 वाजता महिला विशेष बस धावेल . उद्या पासून एकुण तीन मार्गांवर 8 फेर्‍यांच्या माध्यमातून धावणार्‍या या महिला विशेष बस सेवेचा जास्तीत  जास्त महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे .
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago