नाशिक : जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा स्टेथेस्कोप घेऊन फिरणार्या 3 बोगस महिला डॉक्टरांना नर्सच्या सहाय्याने ताब्यात घेतल्यानंतर सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अतिरिक्त शल्यचिकित्सक किशोर प्रसाद श्रीवास यांनी तक्रार दिली. संशयित मेघा गणेश शेट्टी हिच्यासह अन्य दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भटू पाटील करत आहेत. जिल्हा रुग्णालयात या महिला नेमक्या स्टेथेस्कोप अडकून कशासाठी आल्या होत्या? असे करण्यामागे नेमका त्यांचा काय हेतू होता? असा प्रश्न निर्माण झाला आहे.