नाशिक

जलसेवा संकल्प अभियानांतर्गत गोदावरी नदीपात्राची स्वच्छता

रामकुंड परिसरातून दोन हजार विसर्जित गणेशमूर्ती काढल्या बाहेर

नाशिक : प्रतिनिधी
गोदावरी नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नाशिक पाटबंधारे विभागातर्फे रामकुंड परिसरातील, नदीपात्रातून सुमारे दोन हजार विसर्जित गणेशमूर्ती आणि अन्य साहित्य बाहेर काढण्यात आले. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या जलसेवा संकल्प अभियानांतर्गत पंचवटीतील रामकुंड परिसरात श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आगामी ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर सद्या गोदावरीची साफसफाई हाती घेण्यात आली आहे.
राज्यातील जलसंपदा प्रकल्प, सिंचन व्यवस्था, कालवे, धरणे आणि जलाशय यांच्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांना अधिक प्रभावी, पारदर्शक, लोकाभिमुख आणि कालबद्ध सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 2 ते 17 ऑक्टोबरदरम्यान जलसेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
नाशिक पाटबंधारे विभागामार्फत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत गणेश विसर्जनादरम्यान नदीपात्रात जमा झालेल्या गणेशमूर्ती आणि अन्य साहित्य बाहेर काढण्यावर भर देण्यात आला. काही दिवसांपूर्वी झालेल्या गणेशोत्सवात अनेक नागरिकांनी रामकुंड परिसरातील, अमरधामजवळील गोदावरी नदीपात्रात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले होते. त्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने पात्रातील विसर्जित गणेशमूर्ती व साहित्य बाहेर काढले. या मोहिमेत कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, उपकार्यकारी अभियंता मयूर सोनवणे, सहाय्यक अभियंता सुभाष पगारे, उपअभियंता प्रशांत ढोकणे, नारायण डावरे आणि पवन डेडवाल, कनिष्ठ अभियंता संघमित्रा धुरंधर, युवराज महाले, विजय ठाकूर आणि वीरेंद्र पाटील, सिंचन शाखाप्रमुख योगेश पाटील, बर्‍हाटे उपस्थित होते.

Cleaning of the Godavari riverbed under the ‘Jalseva Sankalp Abhiyan’ (Water Service Pledge Campaign).

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago