ऑप्टिकल्स असोसिएशनचा उपक्रम
नाशिक : प्रतिनिधी
ऑप्टिकल्स असोसिएशन व नाशिक ऑप्थॉल्मोलॉजिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोदा स्वच्छता मोहीम यशवंत पटांगण, गोदाघाट येथे उत्साहात पार पडली. या उपक्रमासाठी नाशिक महानगरपालिकेचे सहकार्य लाभले.
या अभियानामध्ये नाशिक ऑप्टिकल्स असोसिएशनचे अध्यक्ष एस. जी. कुमार, आणि निखिल आर जाधव, तसेच नाशिक ऑप्थॉल्मोलॉजिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद दीक्षित, सचिव डॉ. हेमांगी महाजन तसेच दोन्ही असोसिएशनचे विविध पदाधिकारी, सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व सदस्यांनी गोदाघाट परिसरात श्रमदान करून स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. घाट परिसरातील विविध प्रकारचा कचरा गोळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट नाशिक महानगरपालिका व सदस्यांच्या सहकार्याने लावण्यात आली.
यावेळी उपस्थित डॉ. बिर्ला आणि सुदर्शन तातेड यांनी स्वच्छ दृष्टी स्वच्छ सृष्टी हा नारा देत भविष्यातही अशा स्वच्छता मोहिमा, सामाजिक काम सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
Cleanliness campaign in the Godakkath area