मुख्यमंत्री शिंदे उद्या नाशकात

युवा महोत्सव तयारीच्या आढाव्यासाठी मुख्यमंत्री उद्या नाशकात
नाशिक : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिनांक 8 रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहे,
ओझर येथील विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी 3 वाजता आगमन होणार आहे, मुख्यमंत्री ओझर येथून वाहनाने तपोवन येथील मैदानाची पाहणी करणार आहेत. तपोवन येथे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहेत, संपूर्ण भारतातील सुमारे 7 हजार युवक या महोत्सवात सहभागी होणार आहे, मोदी नाशिक दौऱ्यावर येत असल्याने शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. केंद्राचे पथकही या तयारीच्या आढावा घेण्यासाठी येऊन गेले आहेत, युवा महोत्सव आयोजित करण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर असल्याने मुख्यमंत्री स्वतः तयारीचा आढावा घेण्यासाठी आज येत आहेत, सुमारे दोन तासांच्या दौऱ्यात ते संपूर्ण तयारीचा आढावा घेऊन पुन्हा विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत,

मुख्यमंत्री घेणार तयारीचा आढावा

राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक शहरात होणार असुन आयोजनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवार (दि.8)रोजी नाशिक दौर्‍यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय युवा महोत्सव होणार असलेल्या तपोवन मैदानाची पाहणी करणार आहेत.. ते दुपारी 3 वाजता नाशिक शहरात येणार असुन 5:30 ला मुंबईच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत. १२ जानेवारीला या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नाशिक येथील तपोवन मैदानावर उद्घाटन समारंभ होणार आहे. महोत्सवांतर्गत सांस्कृतिक, कौशल्य विकास, युवा कृती असे स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये समुह लोकनृत्य, लोकगीत, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व, छायाचित्र, हस्तकला, वस्त्रोद्योग, कृषी उत्पादने यांचा समावेश असणार आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

2 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago