गांवकरीतर्फे उद्या पाककला स्पर्धा
नाशिक : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दैनिक गांवकरीतर्फे उद्या दिनांक 10 रोजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दीप अप्लायन्सेस आणि मांजरगाव येथील गजानन एन्टरप्रायजेस यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेला दुपारी 12 वाजता प्रारंभ होईल. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना यावेळी कॉलेजरोड येथील दीप अप्लायन्सेसतर्फे गृहोपयोगी वस्तु आणि गजानन एन्टरप्रायजेसचे गणपत हाडपे यांच्यातर्फे सर्व सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तु देण्यात येणार आहे. स्पर्धा दैनिक गांवकरी कार्यालयातील हॉलमध्ये होणार आहे. स्पर्धेनंतर लगेचच बक्षीसांचे वितरण करण्यात येणार आहे.
बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून आ. सीमाताई हिरे, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक तुळशीराम महाराज गुट्टे, मनसेच्या प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, भाजपा शहर सरचिटणीस रोहिणी नायडू, शिवसेना उपमहानगर प्रमुख डॉ. वृषाली सोनवणे, अॅम्रो कॉलेजच्या प्राचार्या सुनंदा सोनी, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव,गजानन एन्टरप्रायजेसचे संचालक गणपत हाडपे, जम्मू-काश्मीर बँकेचे नाशिक शाखेचे व्यवस्थापक धीरज वाघ उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गांवकरी परिवारातर्फे करण्यात आले आहे.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…