शहरात कोसळ धार

नाशिक :  अश्विनी पांडे

शहरात गेल्या दोन दिवसापासून पावसाची जोरदार  बॅटिंग सुरू आहे. सलग दुसर्या दिवशीही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. राज्याच्या इतर भागात दाखल झालेल्या मान्सूनने मात्र नाशिककडे पाठ फिरवली होती ..पण दोन दिवसापासून शहरात जोरदार पाऊस झाला आहे.   पावसामुळे नाशिकरांवरचे पाणी कपातीचे संकट टळणार आहे. त्यामुळे नागरिकही सुखावले आहेत.  नाशिक शहरासह जिल्ह्यात सकाळ पासूनच  पावसाला सुरूवात झाली होती.   मात्र दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरूवात झाली. शहरासह जिल्ह्यात सुरू असणार्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.  तसेच जिल्ह्यातील नद्या ओढे , नाले, शेततळे तुडूंब भरली आहेत.  शहरात काल  दिवसभर धुवांधार पाऊस झाला. पावसामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. ग्रामीण भागात मात्र पावसाला सुरूवात झाल्याने बळीराजा सुखावला आहे.    शहरात मात्र  मुसळधार पावसामुळे   वाहने  घसरून अपघात होण्याच्या घटनात वाढ झाली आहे.  तर शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या  कामामुळे  अनेक भागात खड्यात पाणी साचले होते. तर रस्त्यालगत चिखल झाल्याने वाहनधारकांना वाहने काढणे कठीण जात होते.  तर शहरातील अनेक भागात पावसामुळे रस्त्याची चाळण झाली आहे.

विजेचा लंपडाव

पावसाला सुरूवात झाली वीज गायब होणे हे नेहमीचेच झाले आहे. मुसळधार पावसामुळे   शहरात दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. पावसानंतर बत्तीगुल होण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *