दिलासादायक ! यंदा मान्सूनचे आगमन लवकरच

नवीदिल्ली : तापमानाचा पारा वाढलेला असताना सर्वांनाच दिलासा मिळणार आहे . यंदा मान्सूनचे आगमन दहा दिवस आधीच होणार आहे . केरळच्या किनारपट्टीवर मान्सून २० किंवा २१ मे रोजी धडकणार आहे . त्यानंतर तो पुढील काही दिवसांत देशाच्या उर्वरित भागात बरसणार असल्याचा अंदाज ‘ युरोपियन सेंटर फॉर मीडियम – रेंज वेदर या संस्थेने वर्तवला आहे . उन्हाचा चटका वाढल्याने अनेक
ठिकाणी पाण्याची टंचाई भासत आहे . तसेच पिकांनाही पाण्याची गरज आहे , त्यामुळे अशा काळातच पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे . दरवर्षी मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होतो . यंदा दहा दिवस आधीच मान्सूनची बरसात सुरू होणार आहे . बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलानुसार सध्या अरबी समुद्रात अँटी – सायक्लोन क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळतात . त्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकर पोहचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे . दरम्यान , यंदा देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडणार आहे . भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज १४ एप्रिलला जाहीर केला होता . त्यानुसार यंदा देशात पाऊसमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे . यंदा देशात चांगला पाऊस राहणार असल्याने शेतकऱ्यांना एकप्रकारचा दिलासा मिळाला आहे . यंदा देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होणार असल्यानं ही शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे . जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने १४ एप्रिलला जाहीर केला होता . हा पहिला अंदाज आहे . एकूण पावसाच्या ७४ टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीत पडत असतो . फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्वच नागरिकांसाठी महत्त्वाचा मानला जातो . पाऊसमान चांगला होण्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना , नागरिकांना दिलासा मिळाला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *