महिलांचे अश्लील फोटो पॉर्न वेबसाइटवर टाकणाऱ्याला एक वर्षाचा कारावास

नाशिक : वार्ताहर माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर करत महिलांचे अश्लील फोटो काढून पाॅर्न वेबसाईटवर प्रसिद्ध करणाऱ्याला न्यायालयाने आरोपी ठरवत एक वर्षाचा सश्रम कारावास व तीन लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली. याबाबत सविस्तर वृत्त असे की ,संशयित अक्षय श्रीपाद राव ( 28,शिवायतन बंगलो ,खोडेनगर ,आठवण हॉटेलजवळ ,विधातेनगर ,नाशिक) याने पीडित तरुणीसोबत मैत्री करत तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारिरीक अश्लील चाळे करत मोबाईलमध्ये विवस्त्र फोटो काढून तिचा विनयभंग केला.
तसेच तिचे फोटो पाॅर्न वेबसाइटवर टाकून प्रसारित करून तिची बदनामी केली.असाच प्रकार अक्षय याने दुसर्या तरूणीसोबत देखील केला.
यावरून पीडित तरुणींनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता . या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे नाशिक अनिल पवार ( सध्या नेमणूक वाडीवहे पोलीस ठाणे ) यांनी करत संशयिताविरोधात सबळ पुरावे गोळा करून गुन्हा साबीत होण्याच्या दृष्टीने मुख्य न्यायदंडाधिकारी नाशिक येथे दोषारोपपत्र सादर केले होते .

या गुन्ह्यात सबळ पुरावे , फिर्यादी , साक्षीदार , पंच यांनी दिलेली साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून न्यायमूर्ती व्ही . एल . भोसले यांनी आरोपी अक्षय राव यास साडेतीन वर्षे सश्रम कारावास व तीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली . यामध्ये भादवी ३५४ ( अ ) मध्ये ६ महिने सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड , भादंवि ३५४ ( क ) मध्ये १ वर्ष सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड , माहिती तंत्रज्ञान २००० चे कलम ६७ मध्ये १ वर्ष सक्तमजुरी व १ लाख रुपये दंड व माहिती तंत्रज्ञान २००० चे कलम ६७ ( अ ) मध्ये १ वर्ष सक्तमजुरी व १ लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली . सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून सुधीर सपकाळे यांनी काम बघितले . कोट ‘ अंमलदार म्हणून आर . एच . खकाळे , जी . ए . गायकवाड यांनी सदर गुन्ह्यात शिक्षा लागण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *