नाशिक

त्र्यंबकला गॅस एजन्सीवर काँग्रेसची धडक

प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आक्रमक

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित उत्तर महाराष्ट्र विभाग दोनदिवसीय लोकप्रतिनिधी कार्यशाळेचा समारोप झाला. या कार्यशाळेच्या प्रथम व द्वितीय सत्रादरम्यान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते येथील एलपीजी गॅस एजन्सीवर धडकले.

शासनाचा निषेध करणारे फलक कार्यकर्त्यांच्या हाती होते. प्रतीकात्मक गॅस सिलिंडर तयार करून आणले होते. विशेष म्हणजे, सकाळपासून येथे गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी रांगा लागलेल्या होत्या. वितरण करणारे वाहन शहरात फिरत नाही म्हणून नागरिक स्वत: सिलिंडर घेऊन आलेले होते. तथापि, सकाळी सातपासून दुपारी दोनपर्यंत सिलिंडर असलेले वाहन पोहोचले नव्हते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यासमोर गॅसटंचाईने त्रासलेल्या महिलांनी अडचणींचा पाढा वाचला.
यावेळी त्यांनी सरकारचे लाडकी बहीण म्हणून मिळणारे 1500 रुपये आम्हाला नको आहेत. आम्हाला काँग्रेसच्या काळात होते तसे घरपोच पाचशे रुपयांत सिलिंडर द्या. तेव्हाच्या दराने तांदूळ, गहू, अन्नधान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. महिलांनी उत्स्फूर्तपणे मोदी सरकार, राज्यातील महायुती सरकार यांच्या विरोधात घोषणा दिल्या. काही महिलांनी आमचे मत चोरले, असा आरोप केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्व महिलांचे म्हणणे ऐकून घेतले. सरकारच्या या त्रासदायक कारभाराविरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आंदोलनांच्या माध्यमातून आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील सर्वसामान्य गरीब जनतेच्या पाठीशी आमचा पक्ष आहे आणि तो भांडलवादी, व्यापारीधार्जिण्या सरकारचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

 

 

 

 

Congress attacks Trimbakala Gas Agency

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

33 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

36 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

50 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

54 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

58 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 hour ago