नाशिक

मिळेना गॅस; वर्‍हाडींना उपवास!

विवाह समारंभांत केटरर्स व्यावसायिक, मंगल कार्यालय मालकांपुढे मोठे संकट

नाशिक : प्रतिनिधी
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस सिलिंडर टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. या पाश्वर्र्भूमीवर सरकारकडून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणाच्या मुदतीतही वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका केटरिंग व्यावसायिकांना बसत आहे. विवाह समारंभांच्या आयोजनावर त्याचा परिणाम होत आहे.
मार्च महिन्यात लग्नसराई जोरात असून, विवाहाचे मोठ्या प्रमाणावर मुहूर्त आहेत. त्यामुळे विविध कार्यक्रमांसाठी केटरिंगची मागणी वाढलेली असतानाच व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने केटरिंग व्यावसायिकांसमोर गंभीर अडचण उभी राहिली आहे. मोठ्या प्रमाणावर स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरची आवश्यकता असते. मात्र, सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने अनेक केटरिंग व्यावसायिकांना आधी घेतलेल्या जेवणाच्या ऑर्डर्स रद्द कराव्या लागत आहेत. याचा थेट परिणाम वधू-वरांच्या कुटुंबीयांवर होत आहे.
लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर ऐनवेळी केटरिंग व्यावसायिकांंकडून ऑर्डर रद्द केल्याने पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी करायची, असा मोठा प्रश्न कुटुंबीयांसमोर उभा राहत आहे. परिणामी अनेक कुटुंबीयांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
दुसरीकडे, केटरिंग व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसत आहे. गॅस सिलिंडरअभावी ऑर्डर्स रद्द कराव्या लागत असल्याने उत्पन्नावर परिणाम होत आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगारांपुढेही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने केटरिंग व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संबंधित व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

♦ केटरिंग व्यवसायावर संकट.
♦ व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा मर्यादित.
♦ ऐन लग्नसराईत ऑर्डर्स रद्द.
♦ वधू-वरांच्या कुटुंबीयांसमोर भोजन व्यवस्थेचा प्रश्न.
♦ केटरिंग व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान.
♦ कामगारांच्या रोजगारावर परिणाम.

व्यावसायिक गॅस सिलिंडर देण्यास निर्बंध घातल्याने स्वयंपाक करण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेकांच्या ऑर्डर्स आधीपासून बुक आहेत. त्यांच्या ऑर्डर्स ऐनवेळी रद्द कशा करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कमी लोकांत समारंभ करा किंवा जेवणातील मेन्यू कमी करा, असे पर्याय सुचवत आहोत. शासनाने यावर तातडीने तोडगा काढायला हवा. घरगुती गॅस सिलिंडरप्रमाणे मुदत वाढवत व्यावसायिक गॅस सिलिंडर देत केटरिंग व्यावसायिकांना दिलासा द्यावा.
– मंदार तगारे, आपलीच सेवा केटरिंग

Gas not available; Birthday celebrations fast!

 

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 hour ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 hour ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago