चांदवडच्या बाजारपेठ परिसरातील घटना
चांदवड : वार्ताहर
नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी जाण्याच्या तयारीत असलेल्या चांदवड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. 14) सकाळी घडली. राजेंद्र किसन माळी (वय 49) असे मृत पोलीस हवालदाराचे नाव आहे. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र माळी हे मंगळवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास स्कूटीवरून चांदवड शहरातील बाजारपेठ परिसरातून जात होते. यावेळी झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडण्यासाठी निघालेल्या माळी यांच्यावर काळाने घाला घातल्याने सहकार्यांमधून दुःख व्यक्त होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणार्या पोलीस कर्मचार्याच्या अशा अकाली निधनामुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. चांदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
Constable dies in an accident while heading out for Navratri security duty
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…