जेन-झीची इंग्रजी पुस्तकांना पसंती
नाशिक : प्रतिनिधी
सोशल मीडियाचा वाढता वापर आणि मोबाइलमध्ये गुंतलेला तरुणवर्ग यामुळे वाचनसंस्कृती कमी होत असल्याची चर्चा असताना नाशिकमध्ये मात्र वेगळे चित्र दिसते. सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात, सावानाच्या माध्यमातून वाचनाची परंपरा जोपासली जात आहे.
गेल्या वर्षभरात 70 हजार पुस्तके वाचकांनी वाचनासाठी नेल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थी व तरुणांचाही वाचनाकडे ओढा वाढत असून, जेन-झी पिढीकडून इंग्रजी पुस्तकांना पसंती दिली जात आहे. नाशिकच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणार्या सावानाला वर्षभरात सुमारे 50 हजार वाचक भेट देतात. यात विद्यार्थी व तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. वाचनालयाचे वार्षिक सभासद होण्याबरोबरच आजीवन सभासद होण्याकडेही वाचकांचा कल आहे. त्यामुळे वाचनालयाशी जोडल्या जाणार्या वाचकांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. वाढदिवस किंवा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटवस्तू म्हणून पुस्तके देण्याचा प्रघातही वाढत आहे. यामुळे पुस्तकांची मागणी वाढण्यास हातभार लागतो. मराठीबरोबरच इंग्रजी पुस्तकांचे वाचन करणार्या तरुणांची संख्याही वाढत आहे. वाचनालयात नवीन वाचक सातत्याने येत असल्याने वाचनसंस्कृती टिकून असल्याचे चित्र स्पष्ट होते.
ऐतिहासिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या पुस्तकांना मागणी
छावा, संभाजी, झेप, झुंज, मृत्युंजय, ययाती आणि कर्माचा सिद्धांत या पुस्तकांना वाचकांकडून अधिक मागणी आहे. ऐतिहासिक कादंबर्यांसोबतच व्यक्तिमत्त्व विकासाची पुस्तकेही तरुणांच्या पसंतीस उतरत आहेत. सुहास शिरवळकर, शान्ता शेळके आणि चेतन भगत यांच्या पुस्तकांची वाचकांकडून सातत्याने विचारणा होत असल्याचे चित्र आहे.
ऑनलाइन माध्यमातूनही वाचन
वाचनसंस्कृती केवळ छापील पुस्तकांपुरती मर्यादित राहिलेली नाही. अनेक जण ऑनलाइन माध्यमातूनही वाचन करतात. त्यामुळे वाचक पुस्तकांपासून दूर जात असल्याचे सरसकट म्हणता येणार नाही. वाचनाची माध्यमे बदलत असली, तरी पुस्तकांमधून ज्ञान मिळविण्याची ओढ कायम आहे.
वाचनसंस्कृती टिकावी यासाठी सावानाच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात. वाचक पुस्तकांपासून दुरावला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. सावानात सातत्याने नवीन वाचक येतात. आजच्या काळात अनेक जण ऑनलाइन माध्यमातूनही वाचन करतात.
– देवदत्त जोशी, ग्रंथसचिव, सावानापुस्तके माणसाचे मित्र असतात. पुस्तकांतून विविध प्रकारचे ज्ञान मिळते. पुढची पिढी वाचनसंस्कृतीपासून दूर जाऊ नये, यासाठी पालकांनी मुलांना पुस्तक वाचनाची सवय लावायला हवी. मराठीप्रमाणेच इंग्रजी पुस्तके वाचण्याकडेही कल आहे. – वेद शिंत्रे, वाचक
Reading culture taking root through Savana
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…