चौदाव्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू

सिडको: विशेष प्रतिनिधी

मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोविंद नगर परिसरात सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकाम साईटवर काम करतांना चौदाव्या मजल्यावरुन पडुन बांधकाम कामगारांचा मृत्यु झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
याबाबत अधिकृत माहिती अशी की गोविंद नगर परिसरातील आरडी सर्कल येथे  या इमारतीचे बांधकाम चालु आहे याच बांधकाम वर सेंट्रिंगचे काम चालु असताना सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास विश्वजीत विश्वास (वय २०मुळ रहाणार नावतरा जि नदीया पश्चिम बंगाल) हा कामगारल१४ मजल्यावर सेंट्रिंगचे काम करत असताना सेंट्रिंगची लोखंडी प्लेट सटकली आणि ती थेट बांधकाम कामगाराच्या अंगावर पडली ती थेट लोखंडीप्लेटसह जमीनीवर पडला आणि तो जागीच मृत झाला. याठिकाणी बांधकाम करणा-या कामगारांच्या सुरक्षिततेच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने हा अपघात झाल्याची चर्चा सुरु होती याबाबत मुंबई नाका पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मुंबई नाका पोलिस करीत आहेत
सुरक्षा उपायांचा अभाव
नाशिक मनपा हद्दीत विविध ठिकाणी गगनचुंबी इमारतीचे बांधकाम सुरू आहे ठिकाणी बांधकाम करण्यासाठी लागणारा कामगार वर्ग हा बहुतांशी राजस्थान,मध्यप्रदेश गुजरात,पश्चिम बंगाल आदी परराज्यातुन आणले जातात मात्र या कामगारांच्या सुरक्षेच्या कोणतीही उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे गेल्या वर्षभरात शंभरहून अधिक बांधकाम कामगारांचे अपघाती मृत्यू झाले आहे भविष्यातील या घटना रोखण्यासाठी कामगार उपायुक्तांसह पोलिस कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago