लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024*
जप्त रक्कम, मौल्यवान वस्तू मिळवण्यासाठी
जिल्हा तक्रार समितीकड़े संपर्क साधावा
*- आशिमा मित्तल*
नाशिक प्रतिनिधी
निवडणूक काळात भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण पथक व पोलीस यांच्याकडून जप्त करण्यात आलेली रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू परत मिळवण्यासाठी जिल्हा तक्रार समितीकड़े संपर्क साधावा, असे आवाहन समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार निवडणूक काळात भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण पथक व पोलीस यांच्याकडून रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात येतात. अशी जप्त केलेली रोख रक्कम किंवा वस्तू परत मिळवण्यासाठी दावा दाखल केल्यास त्यावर निर्णय घेण्यासाठी, जिल्हाधिकारी, नाशिक यांचे आदेशानुसार नाशिक जिल्ह्यासाठी जिल्हा तक्रार समिती (District Grievances Committee) ची स्थापना करण्यात आली आहे.
समितीच्या अध्यक्षा आशिमा मित्तल , मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद असून जिल्हा कोषागार अधिकारी (वरिष्ठ) महेश मुरलीधर बच्छाव हे समितीचे सदस्य आहेत. भालचंद्र प्रताप चव्हाण (मो. क्र.-9404695356) नोडल अधिकारी, निवडणूक खर्च नियंत्रण, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक हे संयोजक आहेत. सदर समितीचे कामकाज मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद इमारत, जीपीओ. रोड, त्र्यंबक नाका, नाशिक येथून पार पडेल, असे पत्रकात म्हटले आहे.