नाशिक

समृद्धीवरील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कंटेनर क्लिनिक

जखमींवर होणार निशुल्क उपचार, क्लिनिक, कार्डिओ रुग्णवाहिकेत अत्याधुनिक सुविधा,

गोंदे टोलप्लाझावर 4 जुलैपासून प्रारंभ

सिन्नर : भरत घोटेकर
अपघात झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना जीव गमावा लागतो. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी एसबीआय फाउंडेशनच्या माध्यमातून कंटेनर क्लिनिकची निशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यातील गोंदे येथील टोलनाक्यावर 4 जुलैपासून ही सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे वेळेत उपचार मिळाल्यास अनेक गरजूंचे जीव वाचण्यास मदत होईल.
एसबीआय फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून क्रिएटिव्ह ग्रुप या आरोग्य क्षेत्रात गेल्या 24 वर्षांपासून काम करणार्‍या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कंटेनर क्लिनिकची संकल्पना राबवण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात मेहकर येथील टोलनाक्यावर ही सुविधा एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आली. त्याच धर्तीवर एमएसआरडीसीने ही सुविधा गोंदे टोलनाक्यावर सुरू करावी, यासाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पाठपुरावा केला होता.
त्यातून ही सुविधा एसबीआय फाउंडेशनने सिन्नरच्या गोंदे टोलनाक्यावर सुरू करण्यास संमती दिली.
शुक्रवारी (दि.4) दुपारी 4 वाजता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते आणि खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सीमंतिनी कोकाटे, एसबीआय फाउंडेशनचे चेअरमन जगन्नाथ साहू, क्रिएटिव्ह ग्रुपचे चेअरमन विक्रांत बापट यांच्या उपस्थितीत एसबीआय संजीवनी निरंतर सेवा या सुविधेचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

वेळेवर उपचाराने मिळेल जीवदान

बर्‍याचदा अपघातात अतिरक्तस्राव होऊन रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अनेक जखमी दगावतात. मात्र, कंटेनर क्लिनिकमध्ये त्यांच्यावर तातडीने उपचार झाल्यास रुग्णांना जीवदान मिळेल. रुग्णवाहिका आणि कंटेनर क्लिनिक या दोन्ही सुविधा निशुल्क आहेत.
– अमोघ देसाई, प्रकल्प व्यवस्थापक

अशा आहेत सुविधा

गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी 12 फूट बाय 40 फूट आकाराच्या कंटेनरला क्लिनिकमध्ये रूपांतरीत केले आहे. इमर्जन्सी बेडसह एईडी डिवाइस, व्हेंटिलेटर, शुगर लेव्हल, रक्तदाब मोजण्यासाठीची साधने, ईसीजी मशीन, ऑक्सिजन कन्व्हर्टर आदी अत्यंत गरजेची यंत्रसामग्री उपलब्ध आहेत. या सर्व सुविधा कार्डिओ रुग्णवाहिकेतही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ट्रामा केअरमध्ये काम केल्याचा अनुभव असलेले नामवंत डॉक्टर जखमींवर त्वरित उपचार करतील. त्यांच्या दिमतीला स्टाफ नर्सही असतील.

असा होणार लाभ

समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यानंतर 1033 किंवा 9136958528 या टोल फ्री क्रमांकावरून कंटेनर क्लिनिकला माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल होईल. गोल्डन अवरमध्ये रुग्णावर तातडीचे उपचार मिळाल्यास ते स्टेबल होतील. त्यांना पुढील उपचारासाठी नजीकच्या उपजिल्हा रुग्णालयात किंवा गरज असेल अशा रुग्णालयांमध्ये पोहोच केले जाईल. याशिवाय, प्रवास सुरू असतानाच वाहनचालकांना किंवा प्रवाशांना अचानक अत्यवस्थ वाटल्यास, थकवा जाणवल्यास त्यांनाही या क्लिनिकमध्ये मोफत औषधोपचार घेता येतील.

Gavkari Admin

Recent Posts

ठेकेदारीवरील महापालिका कर्मचार्‍यांच्या वेतनात भ्रष्टाचार

आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांच्या…

2 hours ago

प्लास्टिकमुक्तीसाठी नागरिकांचीच उदासीनता

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…

2 hours ago

आवक घटली, भाजीपाल्याचे दर कडाडले

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…

4 hours ago

सेंट्रल किचनमध्ये अस्वच्छता; गुणवत्तेचे तीनतेरा

दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पोषण…

4 hours ago

सहा हजार मिळकती मालमता कराच्या कक्षेत !

मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…

4 hours ago

पावसाळ्यात घ्यायची काळजी

सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…

4 hours ago