चांदवडमध्ये घरातून गांजासह 1.51 लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदवड : वार्ताहर
शहरातील लेंडी हट्टी परिसरात राहत्या घरातून बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करणार्‍या एका महिलेवर चांदवड पोलिसांनी कारवाई केली आहे. या यशस्वी छाप्यात पोलिसांनी एक किलो 492 ग्रॅम गांजा आणि एक लाख 22 हजार 53 रुपये रोख रक्कम, असा एकूण एक लाख 51 हजार 893 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी जमना समाधान माळी (वय 36, रा. लेंडी हट्टी, चांदवड) या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सध्या चांदवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेदरम्यान, लेंडी हट्टी वस्ती परिसरातील एका राहत्या घरातून बेकायदेशीर गांजाची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खात्री करून पोलीस पथकाने 19 सप्टेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास जमना माळी हिच्या घरात छापा टाकून कसून झडती घेतली. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रदीप गणपत आजगे यांच्या फिर्यादीवरून जमना माळी हिच्याविरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम 8 (क), 20 (ब) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भानुदास नर्‍हे करत आहेत.

Contraband worth ₹1.51 lakh, including cannabis, seized from a house in Chandwad.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *