नाशिक : प्रतिनिधी
तपोवनामधील साधुग्राम च्या प्रस्तावित जागेवर माईस हब उभारण्यासाठी नाशिक महापालिकेने माईस हब अर्थात, भारत मंडपम्ची निविदा रद्द केली आहे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांनी माईस हबची टेंडर प्रक्रिया स्थगित केल्याची माहिती मंगळवारी (दि. 16) दिली.
तब्बल दोनशे कोटी खर्चून प्रदर्शन सेंटर उभारले जाणार होते. दरम्यान, पर्यावरणप्रेमींनी त्यास तीव्र विरोध करत हे सेंटर रद्द करण्याची जोरदार मागणी केली होती. या सेंटरसाठीच तपोवनातील झाडांवर कुर्हाड चालवली जाणार असल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेर याप्रकरणी मनपा प्रशासनाने वाद नको म्हणून ही निविदा रद्द केली आहे. 2015 च्या सिंहस्थात साधुग्रामसाठी जर्मन हँगर उभारण्यात आले होते. सध्याचा माईस हब प्रकल्प स्थगित झाल्याने यंदाच्या सिंहस्थासाठी पुन्हा जर्मन हँगरचा पर्याय पुढे येण्याची शक्यता आहे. सिंहस्थ मेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर तपोवन येथे प्रस्तावित असलेल्या माईस हब प्रकल्पाच्या टेंडर प्रक्रियेबाबत अखेर नाशिक महानगरपालिकेने यू-टर्न घेतला आहे. कुंभमेळामत्री गिरीश महाजन यांनी माईस सेंटर प्रकल्प रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतरही मनपाकडून टेंडर प्रक्रिया सुरूच असल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता. महापालिकेने यापूर्वी जाहीर केलेल्या निविदेनुसार 5 डिसेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने या टेंडरला सात दिवसांची मुदतवाढ देत 12 डिसेंबरपर्यंत प्रक्रिया खुली ठेवण्यात आली होती. मात्र पर्यावरणीय मुद्दे, तपोवनातील शेकडो झाडांवरील कुर्हाडीचा प्रस्ताव आणि नागरिक व पर्यावरणप्रेमी संघटनांचा वाढता विरोध लक्षात घेता अखेर ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने हा प्रकल्प रद्द केल्यानंतर पर्यावरणप्रेमी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे.
Controversial Mice Hub suspended, environmentalists oppose it सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…